भारताच्या इतिहासाशी गद्दारी, ज्यांनी प्राण गमावले त्या भारतीय सैनिकांचा अपमान?

Share

‘तर ईशान्य भारत ताब्यात घ्या!’ – बांगलादेशच्या सल्लागाराची भारताविरोधात गरळ

ढाका : १९७१ मध्ये भारताने रक्त सांडलं… हजारो सैनिकांनी प्राण गमावले… आणि बांगलादेशाला दिलं स्वातंत्र्य! पण आज, त्याच भारताला पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा बांगलादेशातून ऐकू येतेय!

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार डॉ. मुहम्मद युनूस यांचे जवळचे आणि माजी लष्करी अधिकारी ए.एल.एम. फजलूर रहमान यांनी धक्कादायक विधान केलं आहे. “भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला, तर बांगलादेशने ईशान्य भारतातील राज्यांवर ताबा मिळवावा,” अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहून थेट चीनबरोबर लष्करी कारवाईचीही चर्चा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.

https://prahaar.in/2025/05/02/rajasthan-intelligence-arrested-a-jaisalmer-resident-pathan-khan-for-spying-for-pakistan-isi/

ही पोस्ट केवळ वादग्रस्त नाही, तर भारताच्या इतिहासाशी गद्दारी करणारी आहे. कारण ज्याचं स्वातंत्र्य भारताने मिळवून दिलं, तो देश आता भारतविरोधी भाषा बोलतोय?

सरकारने दिलं तात्काळ स्पष्टीकरण

या विधानावर बांगलादेशच्या अंतरिम सरकारने स्पष्टीकरण दिलं असून, “ही वैयक्तिक मतं आहेत, सरकार याचं समर्थन करत नाही,” असं प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी म्हटलं. मात्र देशाच्या सल्लागार मंडळातील व्यक्ती अशा प्रकारची भाषा बोलत असल्याने, बांगलादेशच्या भूमिकेवर संशय घेणं स्वाभाविक ठरतं.

चीनच्या दौऱ्यावरून काय स्पष्ट होतंय?

युनूस अलीकडेच चीनच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी ईशान्य भारतातील सीमावर्ती राज्यांचा उल्लेख करत, “या भागातून चीनच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते,” असं वक्तव्य केलं. त्यानंतर लगेच फजलूर रहमान यांचं ही पोस्ट येणं, हे नुसतं योगायोग मानायचं का?

दरम्यान, भारत शांत आहे, पण दुर्बल नाही. भारतानं नेहमीच आपले शेजारी मित्र मानले… पण अशा धोरणांमुळे जर कोणी भारताची सहनशीलता परीक्षा घेत असेल, तर त्यांना इतिहासाची उजळणी करावी लागेल.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

2 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

2 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

2 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

3 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

3 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

4 hours ago