मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘हाऊस अरेस्ट’ रिॲलिटी शो हा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यावर होणारे अश्लील क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर हा शो वादग्रस्त ठरला आहे. या शोवर अश्लीलतेच्या मर्यादा पार झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करून अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म ‘उल्लू’वर २० एप्रिल पासून नवा रिॲलिटी शो ‘हाऊस अरेस्ट’ सुरु झाला. ‘बिग बॉस ७’ स्पर्धक एजाज खानचा हा शो आहे. या शोचे अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर हा शो वादग्रस्त ठरला आहे. या शोवर अश्लीलतेच्या मर्यादा पार झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करून अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी या शोबद्दल ट्विट केले असून माहिती व प्रसारण मंत्री यांनी अशा प्रकारच्या शोच्या कंटेंटवर मर्यादा घालण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
“स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरत आहेत, जे अत्यंत घाणेरडे आहेत. लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा कंटेंट सहज पोहोचतो आहे.असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे. मी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती करते की उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी. “हाऊस अरेस्ट नावाचा शो हा निव्वळ कंटेंट नाही, तर समाजाच्या मूल्यांवर आघात आहे!”
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…