Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीNirmal Kapoor Death : अनिल कपूर यांच्या आईचे निधन; कपूर कुटुंबासह चाहत्यांना...

Nirmal Kapoor Death : अनिल कपूर यांच्या आईचे निधन; कपूर कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का!

मुंबई : बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor), चित्रपट निर्माता बोनी कपूर आणि अभिनेता संजय कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर (Nirmal Kapoor) यांचे आज, २ मे रोजी निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्मल कपूर यांच्या निधनामुळे कपूर कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Nirmal Kapoor Death)

https://prahaar.in/2025/05/02/aditi-tatkare-said-womens-will-receive-your-ladki-bahin-yojana-april-installment-soon/

निर्मल कपूर यांचा जन्म २७ सप्टेंबर रोजी झाला. गेल्या वर्षी २०२४ मध्ये त्यांनी त्यांचा ९० वा वाढदिवस थाटामाटात साजरा केला होता. त्यावेळी अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर आपल्या आईसोबतच्या खास आठवणींच्या फोटोंचे कोलाज शेअर केले होते. या फोटोंमध्ये अनिल कपूर यांच्यासोबत संजय आणि बोनी कपूर देखील दिसत होते. यात संपूर्ण कुटुंब एकत्र खूप आनंदी दिसत होते. या फोटोंमध्ये अनिल कपूर यांची पत्नी सुनीता कपूर या देखील सासूबाईंच्या बाजूला बसलेल्या दिसत होत्या. तसेच बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूरही दिसत होती.

अनिल कपूर यांचे वडिल सुरिंदर कपूर यांचे १४ वर्षांपूर्वी निधन झाले होते. ते प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. २०११ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. १४ वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले होते. आता त्यांच्या मातोश्रींच्या निधनाने कपूर कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. सुरिंदर कपूर हे एकेकाळी कुटुंबासह पृथ्वीराज कपूरच्या गॅरेजमध्ये राहत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी निर्मल कपूरही त्या गॅरेजमध्ये राहत होत्या. त्यांनी त्यांच्या मुलांचे योग्यरित्या संगोपन केले. (Nirmal Kapoor Death)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -