‘Zhapuk Zhapuk’ : ‘झापुक झुपूक’ वादाच्या भोवऱ्यात

Share

मुंबई : बिग बॉस ५ चा विजेता सूरज चव्हाण ‘झापुक झुपूक’ या नुकत्याच रिलीज झालेल्या मराठी सिनेमातून झळकत आहे. बारामतीमधील एका छोट्याशा गावातून आलेल्या सूरजने त्याच्या साधेपणाने सर्वांचंच मन जिंकून घेतलं. दिग्दर्शक केदार शिंदेंनी बिग बॉस मराठी सिझन ५ च्या मंचावरूनच त्याला थेट सिनेमात हिरोची भूमिका साकारण्याची संधी दिली. सूरजचा ‘झापुक झुपूक’ आता महाराष्ट्रातील सर्व थिएटर्समध्ये झळकत आहे. मात्र आता झापुक झुपूक या नावावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रावडी नेता म्हणजेच सागर शिंदे याने बिग बॉस ५ चा विजेता सूरज चव्हाण याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून फार कमी प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमानंने २४ लाखांची कमाई केली मात्र सहाव्या दिवशीही ही कमाई तितकीच राहिली आहे. सूरज बिग बॉस मध्ये असल्यापासूनच त्याच्या अनेक हटके डायलॉगने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘झापुक झुपूक’ हा डायलॉग सुरजचा नसून सागर शिंदेचा असल्याचं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सागर शिंदे याचं म्हणणं आहे. सागरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडीओ पोस्ट करत दिली आहे.

काय म्हणाला सागर शिंदे ?

सागर शिंदे म्हणाला ” लहानपनापासूनच ‘झापुक झुपूक हा शब्द मी वापरत आलो आहे. २०२२ मध्ये ‘झापुक झुपूक’ हा शब्द मी एका व्हिडीओ मधून पुढे आणला. त्यानंतर २०२३ मध्ये लोकांनी तो डायलॉग उचलून धरला. तसेच सुरजनेही तो त्याच्या व्हिडीओमध्ये वापरण्यास सुरुवात केली. सुरजने बिग बॉसमध्ये हा शब्द वापरल्यामुळे जास्तच चर्चेत आला. माझा हा डायलॉग वापरून सूरज चव्हाण मोठा झाला आहे. हा त्याचा नाही तर माझा डायलॉग आहे. मी हा शब्द रजिस्टर देखील केला आहे.” असं सागर शिंदेने त्याच्या रावडी नेता या यूट्यूब चॅनलवर व्हिडीओ पोस्ट करत सांगितले आहे.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

42 minutes ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

52 minutes ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

1 hour ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

1 hour ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

2 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

3 hours ago