चेन्नई : पंजाब किंग्सचा फिरकीपटू आणि आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज युजवेंद्र चहलने इतिहास घडवला आहे.चहलने २०२५ च्या आयपीएलच्या ४९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गोलंदाजी करताना हॅटट्रिक केली आहे. याचसोबत चहल हा आयपीएल २०२५ मध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाजही ठरला. याशिवाय २०२३ पासून आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज आहे.
बुधवारी, ३० एप्रिलला चेपॉक स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या सामन्यात, चहलने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जसाठी १९ व्या षटकात हा अद्भुत पराक्रम केला. या षटकात भारतीय लेग-स्पिनरने ४ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये एमएस धोनीचा एक आणि हॅट्रिकचा समावेश होता. चहलने १९ व्या षटकाची सुरूवात वाईड बॉलने केली. मग धोनीने पहिल्या लीगल चेंडूवर षटकार मारला. पण इथून चहलने सामन्याचा रोख बदलला आणि स्वत:च्या नावे विक्रमही केला आहे. चहलने यानंतर दुसऱ्या चेंडूवर धोनीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत झेलबाद केलं. त्यानंतर दीपक हुडाने तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या.
https://prahaar.in/2025/05/01/rr-vs-mi-ipl-2025-will-rajasthan-royals-stop-mumbai-indians-victory-streak/
चहलने यानंतर सलग तीन चेंडूवर हॅटट्रिक घेतली. चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दीपक हुडा प्रियांश आर्यकरवी झेलबाद झाला. पाचव्या चेंडूवर चहलने अंशुल कंबोजला क्लीन बोल्ड केलं. तर अखेरच्या चेंडूवर नूर अहमद मोठा फटका खेळायला गेला आणि यान्सनने त्याला झेलबाद केलं.आणि आयपीएल २०२५ मध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. हॅटट्रिक घेताच चहलने त्याची आयकॉनिक पोज देत मैदानात बसला आणि अशारितीने चेन्नईचा डाव १९० धावांवर आटोपण्यात मोठी भूमिका बजावली.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…