Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीKosmos 482 Venus Lander : संपूर्ण जग हादरणार! रशियाने ५३ वर्षांपूर्वी सोडलेला...

Kosmos 482 Venus Lander : संपूर्ण जग हादरणार! रशियाने ५३ वर्षांपूर्वी सोडलेला उपग्रह पृथ्वीवर आदळणार

नवी दिल्ली : जगाची चिंता वाढवणारी मोठी बातमी समोर आली आहे. रशियाने (Russia Satellight) १९७२ साली शुक्र ग्रहासाठी पाठवलेला ‘कोस्मस ४८२’ नावाचा उपग्रह (Kosmos 482 Venus Lander) पृथ्वीवर अनियंत्रितपणे कोसळणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. हा उपग्रह ५३ वर्षांपूर्वी रशियाने (आजचे रशिया) सोडला होता, परंतु रॉकेटमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे तो शुक्र ग्रहावर पोहोचू शकला नाही. त्यामुळे आता हा उपग्रह पृथ्वीवर कोसळण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

https://prahaar.in/2025/05/01/india-hit-by-1-million-cyber-attacks-in-6-days-digital-war-plan-of-5-countries-including-pakistan-revealed/

रशियाने का सोडला ‘कोस्मोस ४८२’?

कोस्मोस ४८२ हा उपग्रह १९७२ मध्ये सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला होता. हा उपग्रह वेनरा या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत तयार करण्यात आला होता. या मोहिमेचा उद्देश शुक्र ग्रहाच्या पृष्टभागावरून डेटा गोळा करणं असा होता. हा उपग्रह वेनरा ८ चं सहकारी यान होतं. वेनरा ८ या यानाने जुलै १९७२ मध्ये शुक्र ग्रहाच्या पृष्टभागावर उतरून ५० मिनिटांपर्यंतचा डेटा पाठवला होता. मात्र कोस्मोस ४८२ आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. तसेच त्याला अंतराळात घेऊन जाणाऱ्या सोयुझ रॉकेटच्या वरच्या भागात काही प्रमाणात बिघाड झाला. कोस्मोस ४८२ (Kosmos 482 Venus Lander) दोन भागात विभागलं गेलं असून त्यातील मुख्य भाग १९८१ मध्ये पृथ्वीच्या वातावरणात येऊन नष्ट झालं. मात्र दुसरा भाग पृथ्वीच्या एका अंडाकार कक्षेत अडकून फिरत राहिला. त्यानंतर आता नेदरलँडमधील डेल्फ टेक्निकल युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक मार्को लेंगब्रोक यांनी टेलिस्कोपवरून केलेल्या विश्लेषणानुसार हा उपग्रह लवकरच पृथ्वीवर आदळणार आहे.

कधी आणि कुठे कोसळणार कोस्मोस ४८२?

५३ वर्षांपूर्वी रशियाने सोडलेला एक उपग्रह अनियंत्रित होऊन पृथ्वीवर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुढच्या आठवड्यात तो पृथ्वीवर कोसळू शकतो. शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार हा उपग्रह १० मे २०२५ च्या आसपास पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. मात्र तो नेमका पृथ्वीवर कुठे आदळेल, याबाबच अचूक अंदाज वर्तवता आलेला नाही.

कसा आहे कोस्मोस ४८२?

लेंगब्रोक यांनी केलेल्या दाव्यानुसार, कोस्मोस ४८२ उपग्रह एक मीटर लांब असून त्याचे वजन ४९५ किलो आहे. कोस्मोस ४८२च्या कक्षेचा कोन ५२ डिग्री आहे. याचा अर्थ हा लँडर ५२ डिग्री उत्तर अक्षांक्ष ते ५२ डिग्री दक्षिण अक्षांशादरम्यान कुठेतरी कोसळू शकतो. यामध्ये युरोप, आशिया अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. मात्र बहुतकरून हा लँडर कुठल्यातरी महासागरात कोसळण्याची शक्यता अधिक आहे. (Kosmos 482 Venus Lander)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -