Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीबेशरम पाकिस्तान : पाकिस्तानला आपल्या लोकांचीही पर्वा नाही!

बेशरम पाकिस्तान : पाकिस्तानला आपल्या लोकांचीही पर्वा नाही!

स्वदेशी परतण्यासाठी पाकड्यांची तळमळ; अटारी बॉर्डर सकाळपासून बंद

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलत, देशातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. मात्र या निर्णयानंतर पाकिस्तानचा असंवेदनशील आणि बेशरम चेहरा पुन्हा समोर आला आहे.

आज सकाळपासून शेकडो पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवर अडकले असून, पाकिस्तानने अद्याप गेट उघडलेले नाहीत. यावरून पाकिस्तान आपल्या नागरिकांनाही परत घेण्यास तयार नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.

पाकिस्तान सरकारची ही भूमिका माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आपल्या देशातील नागरिक अडचणीत असतानाही त्यांना मदत करणे सोडून, पाकिस्तान शांत राहून त्यांची हेळसांड करत आहे. हेच पाकिस्तानचे खरे स्वरूप दर्शवते. देश चालवण्याची जबाबदारी असलेल्या सरकारला ना मानवतेची जाणीव आहे ना आंतरराष्ट्रीय नीतीचे भान.

पहलगाममध्ये जे काही घडले, ते अपघात नव्हता. तो पाकिस्तान पुरस्कृत हल्ला होता. अशा भ्याड कारवायांमुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो दहशतवाद्यांचा सुरक्षित आसरा आहे. आता तर हे स्पष्ट झाले आहे की पाकिस्तान केवळ भारताच्या विरोधातच नाही, तर आपल्या नागरिकांच्याही विरोधात आहे.

पाकिस्तानकडून अटारी बॉर्डरवर सकाळपासून गेट उघडण्यात आलेले नाहीत. पाकिस्तान सरकार त्यांच्या नागरिकांना देखील परत घेण्यास तयार नाही आणि भारतीय नागरिकांना देखील भारतात परत येण्याची अनुमती दिली जात नाही, त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय इमिग्रेशन काउंटरवर अधिकारी पाकिस्तानकडून गेट उघडण्याची वाट पाहत आहेत. अटारी सीमेवर सकाळपासून आलेले पाकिस्तानी नागरिक वाहनांमध्ये पाकिस्तानच्या आदेशाची वाट पाहात आहेत. पाकिस्तानकडून गेट उघडल्यानंतर बीएसएफकडून दस्तऐवजांची तपासणी होईल आणि त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतर इमिग्रेशन तपासणी होऊन ते त्यांच्या देशात परत जाऊ शकतील. सकाळपासून एकाही पाकिस्तानी नागरिकाने अद्याप सीमारेषा ओलांडलेली नाही.

दरम्यान, मोदी सरकार पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानी लोकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले. भारत सरकारने पाकिस्तानला चोख उत्तर देत राष्ट्रीय सुरक्षेचा निर्णय घेतला आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानने आपली लाचारी आणि अमानवी वृत्ती पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -