Thursday, May 8, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखसमृद्ध महाराष्ट्र:‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

समृद्ध महाराष्ट्र:‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मृणालिनी कुलकर्णी

बई कुणाची? महाराष्ट्र आणि गुजरात या दोन प्रातांच्या वादात भाषावार प्रांत रचनेनुसार १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे ‘महाराष्ट्र’ हे राज्य स्थापन झाले. हजारो नागरिकांचे योगदान असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ आंदोलक हुतात्मा पावले. मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथील त्यांच्या स्मारकास वंदन करून, मोठ्या उत्साहात, अभिमानाने १ मे ला ‘महाराष्ट्र दिन’ आपण सारे साजरा करतो. या दिवशी शासकीय आणि इतरत्रही इमारतीवरही ध्वजारोहण होते. शिवाजी पार्क येथे परेडसहित होणाऱ्या कार्यक्रमांत महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सादर करतात.

पूर्वी मोठ्या प्रमाणावर कामगारांचे शोषण होत असे. १५ तास काम आणि पैसे (?). लेबर किसान पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने १ मे १९२३ या दिवशी भारतात प्रथमच हाती लाल झेंडे घेऊन कामगार एकत्र जमले. मुख्य मागणी आठ तास काम आणि पगार. यापूर्वी शिकागो, ऑस्ट्रेलिया येथेही अशा घटना घडल्या होत्या. मागण्या मान्य झाल्यावर कामगारांच्या प्रयत्नांचे आणि कार्याचे प्रतीक म्हणून १ मे हा कामगार दिवस जगभरात साजरा केला जातो. १९८९ मध्ये या दिवसाला ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून मान्यता मिळाली. महाराष्ट्र हे जमिनीच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे सर्वात मोठे राज्य. वळण १- महाराष्ट्राला मोठा इतिहास असलेल्या मराठी संतांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवत वारकरी संप्रदायाचा पाया घातला. (पंढरपूरची आषाढी एकादशी) हाच भक्ती चळवळीचा प्रमुख प्रवाह. यांनीच महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा पाया घातला. वळण २-ग्रामीण भागात समूहाने सादर केले जाणारे पारंपरिक कलाविष्कार; महाराष्ट्राची लोककला. दशावतार, भजन, कीर्तन, पोवाडा आणि लावणी (महाराष्ट्राचे विशेष नृत्य). गाडगेबाबांनी लोककलेतूनच स्वच्छतेचे, शिक्षणाचे महत्त्व लोकांमध्ये बिंबवले. वळण ३-स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले, मर्यादित कुटुंबाचे फायदे सांगणारे महर्षी धोंडो केशव कर्वे. अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी जुन्या रूढी-कर्मकांडांना छेद देऊन लोकांना बुद्धिसाक्षर केले. वळण ४-साहित्यिक-विचारवंत-विज्ञानवादी यांनी अध्यात्माला विज्ञानाची जोड देत समाजाची मानवतावादी बैठक तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विज्ञानाची झालेली भौतिक प्रगती. मूलतः महाराष्ट्र्र राज्य त्याच्या संस्कृती आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध. भारताच्या पश्चिमेकडे असलेला महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा लाभलेला समुद्रकिनारा, घनदाट हिरवाईने झाकलेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दख्खनच्या पठारावरून वाहणाऱ्या नद्या. हे महाराष्ट्राचे नैसर्गिक सौंदर्य.

हिंदवी मराठा साम्राज्यची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आधुनिक महाराष्ट्राचा उदय झाला. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनीच महाराष्ट्रात पहिल्या नौदल पथकाची स्थापना केली. शिवाजी महाराजांनी बांधलेले गड-किल्ले हे महाराष्ट्राचे एैतिहासिक वैभव. त्यांचे संवर्धन करणे ही आजची गरज. भारताच्या स्वातंत्र लढ्यात महाराष्ट्राचे (टिळक आगरकर सावरकर) योगदानही उल्लेखनीय आहे. कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ हे महाराष्ट्राचे पाच विभाग. प्रादेशिक प्रातांनुसार मराठी भाषेचे वळण (लकब) प्रत्येक विभागात बदलते. तसेच सण-उत्सवाचे स्वरूप विभागवार प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार स्वतःचे असते. एकत्र आणणाऱ्या सण-समारंभात महाराष्ट्रात, मुख्यतः मुंबईत इतर धर्मीयही सहभागी होतात.

‘विविधतेत एकता’ या भारतीय संस्कृतीनुसार यात महाराष्ट्र समृद्ध आहे. प्रत्येक प्रार्थना स्थळाचे स्थापत्य वेगळे असते. कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर, शेगांव, शिर्डी या धार्मिक स्थळासोबतच औरंगाबाद, कोकण, आंबोली, महाबळेश्वर ही पर्यटन स्थळे. महाराष्ट्राला लाभलेला समुद्र, डोंगर, दऱ्या, महाराष्ट्रातील अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान, गडचिरोली येथील जंगल, प्राणी संग्रहालय ही नैसर्गिक पर्यटन, याशिवाय हस्तकला, चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी यांच्या प्रदर्शनातूनही महाराष्ट्र दर्शन होते. आपल्याकडील जागतिक वारसा स्थळ अजंठा, वेरूळ, एलिफन्टा लेण्यांतील सौंदर्य आणि जैव विविधतेसाठी प्रसिद्ध असलेला पश्चिम घाट पाहण्यासाठी खास अभ्यासक परदेशातून येतात. कोळीनृत्य, दुर्गापूजा, गणेशउत्सव, दहीहंडी, दिवाळी हे महाराष्ट्राचे प्रमुख आकर्षण. झुणका-भाकर, पूरण पोळी, महाराष्ट्राच्या थाळीला समतोल आहाराची मान्यता आहे. आस्वाद घ्या. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त खांडेकर, शिरवाडकर, करंदीकर; कवी केशवसुत, कुसुमाग्रज (मराठी भाषादिन), चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, व्ही.शांताराम, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, जयंत नारळीकर, विजया मेहता प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राची ओळख जगात पोहोचली आहे. मराठी साहित्य जगाला माहीत आहे. कुसुमाग्रजांचे काव्य गुलजार यांनी हिंदीत केले. अनुवादित साहित्यामुळे परप्रांतीय लेखनाचा आपण आस्वाद घेतो. आज संगीत, नृत्य, अभिनय, नाटक, चित्रपट यांच्या शाखा उपशाखेत कलाकार-तंत्रज्ञान यांची होत असलेली सांस्कृतिक देवघेव, शिकणे-शिकवणे, मार्गदर्शन करणे, प्रोत्साहन देणे ही महाराष्ट्राची समृद्धी आहे.

मुंबई महाराष्ट्र्राची नव्हे भारताची आर्थिक राजधानी. याचे प्रमुख कारण सर्व प्रमुख बँका, वित्तियसंस्था, विमा कंपन्या, मुच्युअल फंड बरोबरच टाटा, गोदरेज, रिलायन्स, शेअर बाजार, स्टॉक एक्स्चेंज शिवाय अनेक आंतरदेशीय कंपन्यांची मुख्यालये मुंबईतच आहेत. नरिमन पॉईंट-बीकेसी ही आजची आर्थिक केंद्र आहेत. आज मुंबईने माहिती क्षेत्र, संगणक, मोबाईल यात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. वातानुकूलित बस रेल्वे सेवेची सुरुवात झाली. रस्ते, रस्त्यांना जोडणारे पूल, जलमार्ग, भुयारी मार्ग, मेट्रो, मुंबई पुणे-मुंबई नागपूर समृद्धी मार्ग सारी कामे वेगाने चालू आहेत. साऱ्या मनोरंजनाची केंद्रबिंदू मुंबईच आहे. बॉलिवूड, देशी-विदेशी खेळाची मैदाने, स्टेडियम, चित्रपट गृह, नाटक, मॉल, नेहरू तारांगण… इ. कापड गिरण्याऐवजी दागिने, हिऱ्याचा व्यापार, आरोग्यसेवा, अन्य उद्योगव्यवसाय, मुंबई हे बंदर असल्याने शिपिंग उद्योग सारे सुस्थितीत आहे. मुंबईची ट्रेन, मुंबईचा वडापाव, मुंबईचे फेरीवाले, उबर टॅक्सी चालवणारे असे रोजगारावर उपजीविका करणारे अनेक. युवकांसाठी स्टार्टअप प्रमाणही मुंबईत जास्त, साऱ्याची घरपोच सेवा उपलब्ध. मुख्यतः महाराष्ट्राच्या कारभाराची वास्तू ‘मंत्रालय’ मुंबईतच. महाराष्ट्र राज्याचे दरडोई उत्पनात लक्षणीय वाढ होतेय. महाराष्ट्र वीज निर्मितीसाठी सोलर प्लांट सगळीकडे नेण्याचा विचार चालू आहे. वित्तीय विभाग, सॉफ्टवेअर, संगणक कैाशल्य, पुण्यात हिंजवडी येथे आयटी पार्क आहे. पुण्यातील बजाज, टाटा मोटर्स अशा अनेक कंपन्यानमुळे पुण्याचा भारताची मोटार सिटी म्हणून उल्लेख करतात.

विदर्भ कृषी प्रधान (लाकूड) तरी विदर्भ, मराठवाडा येथे प्राथमिक बरेच प्रश्न आहेत. नागपूर येथील कार्गो हब आणि विमानतळ हा प्रकल्प. रस्ते निर्मितीत महाराष्ट्र पुढे. महाराष्ट्र नवीन उद्योगांना प्रोत्साहन देतो यासाठी देशातील प्रमुख कंपन्या महाराष्ट्राला प्रथम पसंती देतात. २०२५च्या अर्थ संकल्पात युवकांसाठी, शेती साठी विशेष योजना आहेत. सारा व्यवहार ॲानलाईन झाल्यामुळे कामांत पारदर्शकता आली. मोबाईल बँकिंगमुळे ग्रामीण भागातील लोकांना सोयीचे झाले. हे सारे उल्लेखनीय असतानाही मुंबईत-महाराष्ट्रात स्वच्छता,प्लास्टिक पिशव्याचा रोजचा वापर येथे (नागरिक मनावर घेत नसल्यामुळे) सरकार कमी पडते. कुठेतरी शिस्त किंवा बंदी किंवा काहीतरी कारवाई हवी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकांना पोचवणारी लाल डब्याची एसटी, एसटी आगारची दुरवस्था. बस इंजिनची क्षमता त्यांची विश्रांती स्थाने पूर्णतः कायापालट व्हायला हवा.

ग्रामीण जनतेचा प्रवास कधी सुखासीन होणार? काही वर्षांपूर्वी नितू मांडके यांचे बोलणे आठवते. आज रोज नव्याने गाड्या बाहेर पडतात. हृदरोपणात लागणाऱ्या काही भाग परदेशातून आणाव्या लागत असल्याने पेशंटला महाग पडतात. त्याचे उत्पादन महाराष्ट्रात येथे झाले तर…,रस्ते विकासात फोडलेला डोंगर परत कसा उभारला जाणार? झाडे लावता येतात. ‘महाराष्ट्राची प्रगती हेच महाराष्ट्राचे एकमेव धैय’ हे लक्ष्य असताना जात धर्म प्रांत आणि पक्ष यांच्यामुळे अडथळे येतात. तसेच जन्माने नाही पण कर्माने येथे मोठे होऊन राहूनही लोक महाराष्ट्राला, मुंबईला आपलेसे मनात नाहीत हीच शोकांतिका आहे. १ मे मराठी राज भाषा दिन! मराठी भाषेमुळे मुंबई महाराष्ट्राची झाली. मराठी भाषा-संस्कृतीचे रक्षण, संवर्धन ही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाची जबादारी आहे. जय महाराष्ट्र!
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -