Friday, May 9, 2025
Homeदेशएटीएमपासून ते रेल्वे तिकीटापर्यंत....आजपासून देशात लागू होतायत हे नवे बदल

एटीएमपासून ते रेल्वे तिकीटापर्यंत….आजपासून देशात लागू होतायत हे नवे बदल

नवी दिल्ली: आजपासून मे महिन्याची सुरूवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच तारखेला देशात काही बदल लागू झाले आहेत ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या खिशावर पाहायला मिळू शकतो. १ मे पासून देशात लागू झालेल्या नव्या नियमांवर नजर टाकल्यास आता १ मे पासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. तसेच रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्येही बदल केला आहे.

एटीएममधून पैसे काढणे होणार महाग

आज १ मे २०२५ पासून तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनचा वापर करत असाल तर तुम्हाला अधिक चार्ज द्यावा लागेल. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एनपीसीआयच्या प्रस्तावावर फीस वाढवण्यास परवानगी दिली होती. अशातच पहिल्या तारखेपासून जर ग्राहक आपल्या होम बँकेव्यतिरिक्त इतर एटीएममधून पैसे काढत असतील तर त्यांना प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर १७ रूपयांच्या ऐवजी १९ रूपये द्यावे लागतील. याशिवाय दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून बॅलन्स तपासल्यास ६ रूपयांच्या ऐवजी ७ रूपये द्यावे लागतील.

रेल्वेने बदलला हा नियम

१ मे २०२५ पासून होणारा दुसरा बदल हा रेल्वेशी संबंधित आहे. रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल होत आहे. आता वेटिंग तिकीट केवळ सामान्य डब्यामध्ये मान्य असेल. म्हणजेच जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल तर तुम्ही स्लीपर कोचमधून प्रवास करू शकत नाही. तसेच अॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड १२० दिवसांनी कमी होऊन ६० दिवस करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -