Friday, May 9, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वखूश खबर... LPG सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

खूश खबर… LPG सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

मुंबई: दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे मे महिन्याच्या सुरुवातीला सरकारी तेल कंपन्यांनी LPG गॅसचे दर अपडेट केले आहेत. (LPG Cylinder Price) यावेळी मे महिन्यात व्यावसायिक गॅसच्या (Commercial LPG Cylinder) किमतीमध्ये सलग दुसऱ्या कपात करण्यात आली आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे मे महिन्याच्या सुरुवातीला LPG गॅसच्या दरात सुधारणा केली जाते. त्यानुसार यावेळीही घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नाही, मात्र व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १७ रुपयांची कपात जाहीर करण्यात आली आहे.

LPG सिलिंडर स्वस्त झाला

1 मे रोजी गॅसच्या किमतीत झालेल्या बदलानुसार, आता राजधानी दिल्लीत दोन महिन्यांत 19 किलोच्या गॅस सिलिंडरसाठी 1,747.50 रुपये मोजावे लागतील तर, गेल्या महिन्यात यासाठी 1,762 रुपये आणि मार्चमध्ये 18,03 रुपये द्यावे लागत होते. मुंबईत या सिलिंडरची किंमत आता 1713.50 रुपयांऐवजी 1699 रुपये झाली आहे. महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत सर्वात कमी आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर आता 1868.50 रुपयांऐवजी 1851.50 रुपये झाला आहे.

 

घरगुती गॅस सिलिंडरसाठी किती पैसे मोजावे लागणार?

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १७ रुपयांची कपात करण्यात आली असताना, घरगुती गॅस सिलिंडरसाठी किती पैसे मोजावे लागणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14. 2 किलोच्या दरात कुठलीही दरवाढ अथवा कापत केलेली नाही.

घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये 853 रुपयांना, कोलकातामध्ये 879 रुपयांना, मुंबईत 852.50 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपयांना उपलब्ध असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -