Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीवादग्रस्त जाहिरातीमुळे बाब रामदेव अडचणीत

वादग्रस्त जाहिरातीमुळे बाब रामदेव अडचणीत

नवी दिल्ली : वादग्रस्त जाहिरात केल्याप्रकरणी योगगुरू बाबा रामदेब पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. हमदर्द नॅशनल फाऊंडेशन इंडिया कंपनीच्या रुहअफजा सरबताबाबत आक्षेपार्ह जाहिरात केल्याबद्दल न्यायालयाने अवमान याचिकेवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार बाबा रामदेव यांनी रुह अफजा या सरबताविषयी एका व्हिडीओतून आपत्तीजनक टिपण्णी केली होती. याबाबत हमदर्द नॅशनल फाऊंडेशनने दिल्‍ली हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अमित बंसल यांनी या याचिकेवर सुनावणी घेतली. यावेळी ते म्‍हणाले की, रामदेव बाबा या प्रकरणात प्रथमतः दोषी दिसत आहेत. त्‍यामुळे त्‍यांनी न्यायालयात प्रत्‍यक्ष हजर रहावे. यानंतर वकील राजीव नायर हे पतंजली व रामदेवबाबा यांच्यावतीने न्यायालयात हजर झाले. त्‍यांनी न्यायालयाला सांगितले की येत्‍या 24 तासांत सर्व माध्यमांतून हा व्हिडीओ हटवला जाईल. आपल्‍या उत्‍पादनांची जाहिरात करत असताना रामदेव बाबांनी रूह अफजा सा सरबताविषयी धार्मिक रंग देऊन टिपण्णी केली होती. रुह अफजा हे सरबत तुम्‍ही विकत घ्‍याल तर त्‍या कंपनीला पैसे जातो. जी कंपनी देशामध्ये मदरसे व जिहाद सारख्या गोष्‍टींना पैसा पुरवते. त्‍यामुळे हा शरबत विकत घेऊन तुम्‍ही ‘शरबत जिहाद’ चा प्रसार होतो त्‍यापेक्षा आमचा सरबत घ्‍या असे आवाहन ते करताना दिसतात.

या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव हे आपली कंपनी पतंजलीच्या गुलाब नामक सरबताची जाहिरात करताना दिसतात. त्‍याचवेळी हमदर्द नॅशनल फॉऊंडेशन इंडिया या कंपनीच्या रुह अफजा या सरबाताला धार्मिक रंग देताना दिसत आहेत. या सरबाताच्या विक्रीतून आलेला पैशातू मस्‍जिद, मदरसे बनवले जातात. जे आजकाल लव्ह जिहाद , व्होट जिहाद यासारखे प्रकार सुरु आहेत तसाच हा सरबत जिहाद सुरु आहे. असे त्‍यांनी म्‍हटले आहे. त्‍यांचा हा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल झाला असून त्‍याची दखल घेत न्यायमूर्ती अमित बंसल यांनी हा व्हिडीओ हटवण्यास सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -