Friday, May 9, 2025
HomeमनोरंजनSamantha Ruth: 'या' चाहत्याने, दक्षिणेतील अभिनेत्री समंथा रुथचे चक्क मंदिर उभारलं

Samantha Ruth: ‘या’ चाहत्याने, दक्षिणेतील अभिनेत्री समंथा रुथचे चक्क मंदिर उभारलं

मुंबई: भारतातील दक्षिणेतील सिनेकलाकार तिथल्या जनतेच्या मनात बसतात. त्याची क्रेझ एव्हडी आहे की काही दक्षिणेतील सिनेकलाकार मुखमंत्री झाले आहेत. म्हणजेच दक्षिणे तील जनता सिनेकलाकारांवर भरभरुन प्रेम करताना दिसली आहे. याचदरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आंध्र प्रदेशात अभिनेत्री समांथाच्या नावाने एक मंदिर बांधलेले दिसत आहे.

अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आंध्र प्रदेशात अभिनेत्री समांथाच्या नावाने एक मंदिर बांधलेले दिसत आहे. 28 एप्रिल रोजी अभिनेत्री समांथा रुथने तिचा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांनीही समंथाचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री सामंथाचे मंदिर दिसत आहे. या चाहत्याने या मंदिरात अभिनेत्रीचा 38 वा वाढदिवस साजरा केला. व्हिडिओमध्ये मंदिराबाहेर ‘समंथाचे मंदिर’ असे लिहिलेले दिसत आहे. आत प्रवेश केल्यावर सामंथाचे दोन पुतळे दिसतात; त्यापैकी एक सोनेरी रंगाचा आहे.

https://prahaar.in/2025/04/30/a-14-year-old-stormy-century-vaibhav-suryavanshi-created-history/

त्या चाहत्याने अभिनेत्रीसाठी केवळ मंदिरच बांधले नाही तर अनाथ मुलांसाठी एक पार्टी देखील आयोजित केली. अनाथ मुलांसोबत सामंथाच्या वाढदिवसाचा केकही कापण्यात आला. हे मंदिर बांधणाऱ्या चाहत्याचे नाव तेनाली संदीप आहे. या चाहत्याने माध्यमांशीही संवाद साधला. तेनाली म्हणाला, ‘मी आंध्र प्रदेशचा आहे. मी सामंथाचा खूप मोठा चाहता आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. मी काही वर्षांपूर्वी हे मंदिरही बांधले होते. दरवर्षी मी सामंथाच्या वाढदिवसाला मुलांना खायला घालतो आणि केक कापतो. समंथाने मला खूप प्रेरणा दिली आहे.

अभिनेत्री समांथाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी ती ‘सिटाडेल हनी बनी’ या वेब सिरीजमध्ये दिसली होती, ज्यामध्ये वरुण धवन देखील होता. ती ‘ब्रह्मांड’ ही वेब सिरीज देखील करत आहे. निर्माती म्हणून, समंथाचा एक चित्रपटही या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -