Thursday, May 8, 2025
Homeक्रीडाShikhar Dhawan Slams Shahid Afridi: शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला फटकारले, म्हणाला "आधीच...

Shikhar Dhawan Slams Shahid Afridi: शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला फटकारले, म्हणाला “आधीच पातळी सोडली आहे आता अजून…”

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याविरुद्ध भारतीय जनतेचा राग शिगेला पोहोचला आहे. जगभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त होत असताना, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) केलेले भारतीय सैन्यावरील वादग्रस्त विधानामुळे अनेकांचे रक्त खवळलं आहे. ज्याला, शिखर धवनकडून (Shikhar Dhawan) चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ लोकांनी आपले प्राण गमावले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना समर्थन देणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान, पाकिस्ताननेदेखील भारतविरुद्ध गरळ ओकायला सुरूवात केली आहे. यात भर म्हणून की काय, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने देखील भारतीय सैन्याविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते. ज्याचा शिखर धवनने चांगलाचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाला शिखर धवन?

धवनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर)वर शाहिद आफ्रिदील टॅग करत म्हंटले की, “आम्ही तुम्हाला कारगिलमध्येही हरवलं होतं. आधीच पातळी सोडली आहे आता अजून किती पातळी सोडणार, उगाचच कमेंट्स करण्यापेक्षा तुमच्या देशाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा.” पुढे धवनने “आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे. भारत माता की जय! जय हिंद!” असे देखील लिहिले.

काय म्हणालेला शाहिद आफ्रिदी?

शाहीद आफ्रिदीने सामा टीव्हीवर मुलाखत देताना भारतीय सैन्याविरुद्ध संतापजनक वक्त्यव्य केलं होतं. तो म्हणाला की, “जर जम्मू काश्मीरमध्ये फटाके जरी फुटले तरी ते पाकिस्तानने केले आहे, असे बोलले जाते. काश्मीरमध्ये तुमचे ८० हजार सैनिक आहेत आणि तरीही हा हल्ला घडला. याचा अर्थ तुम्हीकाहीच कामाचे नाही आहात, कारण तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही.”

केंद्र सरकारने शोएब अख्तरचं (Shoaib Akhtar) युट्यूब चॅनेल ब्लॉक केल असून, त्यासोबत इतर १५ युट्युब चॅनलचे भारतातील प्रसारण देखील रोखले आहेत.

ज्यामध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज सारख्या प्रमुख पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा समावेश आहे. या सर्व चॅनेलवर भारताबद्दल चुकीची माहिती प्रसारित करणे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -