Friday, May 9, 2025
Homeक्रीडाIPL 2025IPL 2025 CSK vs PBKS : पंजाब व चेन्नई आमने सामने

IPL 2025 CSK vs PBKS : पंजाब व चेन्नई आमने सामने

मुंबई (ज्ञानेश सावंत) : आज चेन्नईच्या चिंदंबरम मैदानावर पंजाब विरुद्ध चेन्नई हा सामना खेळला जाणार आहे. मागील दोन सामन्यात पंजाबला विजय मिळवता आला नाही त्यामुळे आजचा सामना ते विजयाच्या हेतूनेच खेळतील. बेंगळुरूकडून पराभव पत्करल्यावर पंजाबने कोलकत्ता विरुद्ध चांगली फलंदाजी केली, पण तो ही सामना पावसामुळे गमवावा लागला. आज पंजाब पुन्हा एकदा चांगली धावसंख्या उभारेल अशी आशा आहे. पंजाबचे सर्वच फलंदाज फॉर्म मध्ये असल्यामुळे ते त्यांना सहज शक्य आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना चेन्नईला कमी लेखून चालणार नाही. चेन्नईचे फलंदाज अपयशी ठरत असतील तरीही कोणत्या फलंदाजाला कधी सुर गवसेल हे सांगता येणार नाही.

आयपीएल २०२५ मध्ये आता चुरस पाहायला मिळते आहे, प्रत्येक संघ जिंकण्यासाठी झगडताना दिसतो आहे. गुण तकत्यातील तळाचे संघ समोरच्या संघाला सोपा विजय मिळवू देत नाही. पर्वच्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून विजय मिळवला. चेन्नई जरी गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर असेल तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही कारण २०-२० मध्ये कधीही काहीही होऊ शकते. पंजाबने आजचा सामना गमावला तर त्यांच्यासाठी पात्रता फेरी गाठणे कठीण होईल. चला तर जाणून घेऊयात पंजाब चेन्नई विरुद्ध होणाऱ्या सामन्यात जिंकण्यासाठी कोणती व्यूहरचना करते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -