Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीPahalgam Terror Attack: आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांचा गोळीबार, सलग सहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे...

Pahalgam Terror Attack: आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांचा गोळीबार, सलग सहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू आणि काश्मीर: पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने चहू बाजूने पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. भारताच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे, आणि या भीतीमुळेच पाकड्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यास (Pakistan Ceasefire Violation) सुरुवात केली आहे. नियंत्रण रेषेनंतर () पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) देखील गोळीबार केला असल्याचे वृत्त आहे.

२९-३० एप्रिलच्या रात्री, ने जम्मू आणि काश्मीरमधील नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. कोणत्याही चिथावणीशिवाय पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांकडून छोट्या शस्त्रांनी हा गोळीबार करण्यात आला असल्याची बातमी आहे. अशाप्रकारे पाकिस्तानी सैन्याद्वारे सलग सहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

गेल्या सहा दिवसांपासून सीमेवर गोळीबार, भारतीय सैन्यांकडून चोख उत्तर

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला युद्धाची धडकी भरली आहे. त्याच्या नैराश्यात त्याने आंतरराष्ट्रीय सीमेवरही युद्धबंदीचे उल्लंघन सुरू केले आहे. याआधी, पाकिस्तान पाच दिवसांपासून एलओसीवर युद्धबंदीचे उल्लंघन करत होता. पण बुधवारी पाकिस्तानने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. त्यांनी जम्मूच्या परागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला आहे. संरक्षण सूत्रांचे म्हणणे आहे की, मंगळवारी सकाळपर्यंत पाकिस्तानी सैन्य फक्त नियंत्रण रेषेवरच युद्धबंदीचे उल्लंघन करत होते, परंतु आता बुधवारी रात्री जम्मूच्या परागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला आहे, याशिवाय, बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यांमधील नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून आणि परगवाल सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडेही लहान शस्त्रांचा अकारण गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. भारतीय सैन्याच्या जवानांनी लगेचच ताबा घेतला आणि प्रत्युत्तर दिले.

यादरम्यान भारतीय लष्कराने आतापर्यंत तोफखाना, तोफा आणि हवाई संरक्षण तोफा वापरल्या नाही. कारण पाकिस्तानकडून फक्त लहान शस्त्रांनी गोळीबार केला जात आहे.

सीमावर्ती भागात ऑपरेशनल अलर्ट जारी

पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर, नियंत्रण रेषेच्या अनेक भागांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. भारतीय लष्कर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आणि सीमावर्ती भागात ऑपरेशनल अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रत्यक्षात, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकार ऍक्शन मोडमध्ये आहे आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -