Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीPahalgam: नरेंद्र मोदींची तीनही दलांना कारवाईसाठी फ्री हँड, पाकिस्तानची झोप उडाली

Pahalgam: नरेंद्र मोदींची तीनही दलांना कारवाईसाठी फ्री हँड, पाकिस्तानची झोप उडाली

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानी सर्वच बाजूने कोंडी करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल (29 एप्रिल) लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह तसंच निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी लष्करावर पूर्ण विश्वास दाखवत फ्री हँड दिला. पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्याने मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यांविरुद्ध जगभरातून निषेध व्यक्त केला जात असून, दहशतवाद्यांना समर्थन देणाऱ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याची मागणी देशभरातून होत आहे. त्यानुसार दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराच्या मोठ्या कारवायांना सुरूवात झाली आहे. मात्र दहशतवाद्यांचे आका सीमापार पाकिस्तानात असल्यामुळे, दहशतवादाविरोधात आता सीमापार लढाई सुरू करण्याचा विडा मोदी सरकारने उचल्याचं दिसत आहे.

पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेताना, नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना कारवाईसाठी हिरवा कंदील दाखवल्याने, भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्लाबोल करू शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे.

पाकिस्तानला हल्ल्याची भीती, मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद

नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरारने मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी येत्या 24-36 तासांत भारत मोठी कारवाई करणार असल्याचा दावा अत्ताउल्लाहने केला आहे. पाकिस्तानचे सूचना मंत्री अताहउल्ला तरार यांनी X च्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर केला.

पाकिस्तान गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत “भारत पहलगाम हल्ल्याच्या बहाण्यानं पुढील 24 ते 36 तासांत पाकिस्तानवर सैन्य हल्ला करू शकते. आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देऊ…,” असं मंत्री अत्ताउल्लाह तरार म्हणाला. यादरम्यान त्याने भारताविरोधात गरळ ओकत काही गंभीर आरोप देखील केले.

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

कोणत्याही निष्पक्ष चौकशीशिवाय भारतानं थेट लष्करी पर्याय निवडण्याची तयारी दाखवली असून, यामुळं क्षेत्रीय शांतता भंग होऊ शकते आणि ही घातक बाब आहे असं म्हंटलं आहे. पाकिस्ताननं या प्रकरणात स्वतंत्र आणि निष्पक्ष आंतरराष्ट्रीय जाणकारांच्या मदतीनं चौकशीची मागणी केली असून, भारत मात्र या मागणीला धुडकावत संघर्षाच्या वाटेवर निघाला असल्याची उलटी बोंब तरारने ठोकली आहे.

तिथं पाकिस्तानवर भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीचं सावट असतानाच दुसरीकडे शेजारी राष्ट्राचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनीसुद्धा रॉयटर्सशी संवाज साधताना पाकिस्तान हाअ अलर्टवर असून भारतानं हल्ला केल्यास आपला देश त्याचं प्रत्युत्तर देईल असा पोकळ विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी अण्वस्त्रांचा वापर फक्त आणि फक्त देशाच्या अस्तित्वाचाच प्रश्न उद्भवल्यास केला जाईल असं म्हणत भारताला डिवचलं.

तिथं पाकिस्तानचा भीतीनं थरकाप उडालेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात देशातून दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी गरज भासल्यास आवश्यक कारवाईची मुभा सैन्यदलाला दिली आहे. ज्याअंतर्गत भारतीय सैन्याला ठिकाण, लक्ष्य आणि वेळ निवडण्याची मुभा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -