Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीMilk Price Hike : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर 'मदर डेअरी' कंपनीच्या दुधाची दरवाढ!

Milk Price Hike : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ‘मदर डेअरी’ कंपनीच्या दुधाची दरवाढ!

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणाऱ्या अक्षय्य तृतीया सण राज्यभरात साजरा केला जात आहे. अक्षय्य तृतीया नवीन सुरुवात, संपत्ती आणि समृद्धीसाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. यादिवशी सुरू केलेली किंवा खरेदी केलेली कोणतीही गोष्ट चिरस्थायी यश मिळवून देते असे मानले जाते. मात्र याच अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर दूध खरेदीदारांना फटका बसत आहे. मदर डेअरी (Mother Dairy) कंपनीनं दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल बुधवार, ३० एप्रिल म्हणजेच आजपासून पासून लागू होणार आहे. दूध खरेदीचा खर्च वाढल्यानं हे पाऊल उचलावं लागल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. (Mother Dairy Milk Price Hike)

https://prahaar.in/2025/04/30/first-cabinet-meeting-after-pahalgam-attack-today-pm-modi-may-take-big-decision/

मदर डेअरीनं आज, बुधवारपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली. गेल्या काही महिन्यांत दूध खरेदीच्या खर्चात प्रतिलिटर चार ते पाच रुपयांनी वाढ झाल्यानं हा बदल करण्यात आला आहे. उन्हाळ्याची सुरुवात आणि उष्णतेची लाट याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे.यामुळे शेतकऱ्यांकडून दूध खरेदीच्या दरात वाढ झाली आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचंही हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मदर डेअरीचे म्हणणं आहे.

शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाला आधार देताना ग्राहकांना चांगल्या दर्जाचं दूध उपलब्ध देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा बदल वाढीव खर्चाचा केवळ अर्धा भाग आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचंही हित साधणं हे आपलं उद्दिष्ट आहे, असं कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि उत्तराखंडच्या बाजारपेठांसाठी हे नवे दर ३० एप्रिल पासून लागू झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -