Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीयेत्या पाच वर्षांत म्हाडा बांधणार आठ लाख घरे

येत्या पाच वर्षांत म्हाडा बांधणार आठ लाख घरे

म्हाडाच्या घरांमध्ये १ लाख १ हजार ७४३ कोटी गुंतवणूक

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई मेट्रो रिजनमध्ये (एमएमआर) २ लाख ४९ घरे मंजूर आहेत, त्यामध्ये पुढील पाच वर्षांत ५ लाख ३२ हजार ६५२ घरे बनवण्यात येतील. यामध्ये मुंबई बोर्ड, दुरुस्ती बोर्ड व कोकण बोर्डाचा समावेश आहे. मुंबई व एमएमआरडीए रिजनसाठी ग्रोथ हब व गृहनिर्माण धोरण बावत म्हाडाने सुचवलेल्या शिफारशींची यावेळी जयस्वाल मांनी माहिती दिली. पुढील पाच वर्षांत म्हाडाच्या घरांमध्ये १ लाख १ हजार ७४३ कोटी गुंतवणूक होणार असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल म्हणाले. सोमवारी म्हाडाने आयोजित केलेल्या पुनर्विकास परिषद व गुंतवणूकदार मीटमध्ये ते बोलत होते.

पुनर्विकासासाठी तब्बल ३०, ३५ वर्षे लागणे अत्यंत चुकीचे आहे. पुनर्विकासाची कामे तातडीने व प्राधान्याने करावीत, तुम्हाला दुआ मिळेल, असा सल्ला म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी विकासकांना दिला. ३०, ३५ वर्षे पुनर्विकासासाठी लावू नका, अशी प्रकरणे पुढे आल्यानंतर आपल्याला गुन्हेगार असल्यासारखे वाटते, असे ते म्हणाले. यावेळी एमसीएचआय क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल, नितेंद्र मेहता, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सीईओ मिलींद बोरीकर, दुरुस्ती मंडळाचे मिलींद शंभरकर, माजी सनदी अधिकारी गौतम चॅटर्जी, ज्येष्ठ विकासक निरंजन हिरानंदानी, धवल अजमेरा, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल नरेडकोचे बोमन इराणी व मोठ्या संख्येने विकासक, गुंतवणूदार उपस्थित होते.

मोतीलाल नगर गोरेगाव, वांद्रे रेक्लेमेशन, अभ्युदय नगर काळाचौकी, पोलीस हाऊसिंग, आदर्श नगर वरळी, जीटीबी नगर सायन कोळीवाडा, सिद्धार्थनगर अशा ठिकाणी गुंतवणुकदार म्हाडाच्या मार्फत पुनर्विकास केला जाईल, रेरेंटल हाऊसिंगसाठी म्हाडाने आता पुढाकार घेतला आहे. भाडेतत्त्वावरील घरांमधून मिळणाऱ्या भाड्याचे उत्पन्न पुढील दहा वर्षांसाठी आयकर मुक्त असेल, अशी शिफारस करण्यात आली आहे. कर्जावरील व्याज दरात कपात, बाय बैंक धोरण अशा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. परवडणाऱ्या भाढतत्त्वावरील घरांसाठी म्हाडा नोडल एजन्सी म्हणून काम करेल, मुंबई साठी अतिरिक्त ०.५ एफएसआय व एमएमआर रिजनसाठी ०.३ एफएसआय देण्यात मेईल. रेटलसाठी प्रीमियम माफ केला जाईल, डेव्हलपमेंट चार्च ५० टक्के माफ केला जाईल, प्रॉपर्टी टॅक्स ५०% केला जाईल, अशा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. निरंजन हिरानंदानी म्हणाले, मुंबई, महाराष्ट्रातील उद्योग रेंटल हाऊसिंग नसल्याने बंगळूरु हैदराबादला जात आहेत हा रेंटल हाऊसिंग नसल्याचा परिणाम असल्याचे मत त्यांनी मांडले. रेंटल हाऊसिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावर जास्त भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -