विशाखापट्टणम: बुधवारी सकाळी विशाखापट्टणम येथील श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सवम उत्सवादरम्यान मंदिराची भिंत कोसळल्याने (Temple Wall Collapse) ८ जणांचा मृत्यू झाला आहे, यात चारजण जखमी झाले. एसडीआरएफ आणि एनडीआरएफकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
बुधवारी सकाळी विशाखापट्टणममधील सिंहचलम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. वार्षिक चंदनोत्सवादरम्यान ही घटना घडली,
वृत्तसंस्था एएनआयनुसार, बुधवारी सकाळी विशाखापट्टणम येथील श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सवम उत्सवादरम्यान बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना रात्री २.३० च्या सुमारास घडली. यादरम्यान त्या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडत होता.
श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा २० फूट लांबीचा भाग अचानक कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. राज्याच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनी या अपघातासंदर्भात माध्यमांशी बोलताना सांगितले कि, “रात्रभर मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे माती सैल झाली होती, ज्यामुळे भिंत कोसळली. सिंहगिरी बसस्थानकापासून घाट रस्त्यावरील शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळील ३०० रुपयांच्या तिकिटाच्या रांगेत ही भिंत पडली.
टेलिकॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचा आढावा घेताना, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली. याशिवाय, प्रत्येक पीडितेच्या कुटुंबातील एका सदस्याला देणगी विभागांतर्गत मंदिरांमध्ये आउटसोर्सिंगची नोकरी दिली जाईल. तसेच या घटनेची तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.
ट्विटरवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची दाखल घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…