Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीTemple Wall Collapse: मंदिराची भिंत कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Temple Wall Collapse: मंदिराची भिंत कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

विशाखापट्टणम: बुधवारी सकाळी विशाखापट्टणम येथील श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सवम उत्सवादरम्यान मंदिराची भिंत कोसळल्याने (Temple Wall Collapse) ८ जणांचा मृत्यू झाला आहे, यात चारजण जखमी झाले. एसडीआरएफ आणि एनडीआरएफकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

बुधवारी सकाळी विशाखापट्टणममधील सिंहचलम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. वार्षिक चंदनोत्सवादरम्यान ही घटना घडली,

वृत्तसंस्था एएनआयनुसार, बुधवारी सकाळी विशाखापट्टणम येथील श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सवम उत्सवादरम्यान बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना रात्री २.३० च्या सुमारास घडली. यादरम्यान त्या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडत होता.

२० फूट लांबीचा भाग कोसळल्याने मृत्यू

श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा २० फूट लांबीचा भाग अचानक कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. राज्याच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनी या अपघातासंदर्भात माध्यमांशी बोलताना सांगितले कि, “रात्रभर मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे माती सैल झाली होती, ज्यामुळे भिंत कोसळली. सिंहगिरी बसस्थानकापासून घाट रस्त्यावरील शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळील ३०० रुपयांच्या तिकिटाच्या रांगेत ही भिंत पडली.

मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी २५ लाखांची मदत देण्याची घोषणा

टेलिकॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचा आढावा घेताना, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली. याशिवाय, प्रत्येक पीडितेच्या कुटुंबातील एका सदस्याला देणगी विभागांतर्गत मंदिरांमध्ये आउटसोर्सिंगची नोकरी दिली जाईल. तसेच या घटनेची तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.

पंतप्रधान मोदींनीही केली भरपाईची घोषणा

ट्विटरवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची दाखल घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -