डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासुन मुलांना पळवुन नेण्याचे प्रकार घडत आहेत. काही दिवसांपुर्वी डोंबिवली परिसरात भयानक घटना घडली. डोंबिवलीतील एका पाणीपुरी दुकानात आई आणि तिची मुलगी पाणीपुरी खात होत्या. पाणीपुरी खात असताना आई स्वत: एक पुरी खात होती आणि दुसरी पुरी ती तिच्या मुलीला देत होती असे चालु असतानाच एका अद्नयात रिक्षावाल्याने अगदी काही सेकंदात त्या मुलीला अलगद उचलून रिक्षामध्ये टाकले. आणि हा सगळा प्रकार अगदी काही सेकंदात पाणीपुरी दुकानाच्या समोर घडला.जेव्हा त्या रिक्षेवाल्याने त्या मुलीला रिक्षात टाकले तेव्हा ती मुलगी जोरजोरात आई आई असे ओरडत होती, मात्र रिक्षाच्या मागील सिटवर बसणाऱ्या व्यक्तीने त्या मुलीच्या तोंडावर हात ठेवून तिचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत होता. आणि रिक्षेच्या आतमध्ये दामटवून बसवण्याच्या प्रयत्न केला की जेणेकरून ती मुलगी कोणाच्या नजरेस पडणार नाही आणि आपण पकडले जाणार नाही, परंतु हा प्रकार घडत असताना तिथे शेजारी पाणीपुरी खात असणाऱ्या व्यक्तीने कोणताही विलंब न लावता आपली बाईक काढली आणि त्या रिक्षाचा पाठलाग केला. पाठलाग करुन त्या रिक्षेसमोर आपली गाडी येऊन थांबवली आाणि त्या मुलीला जवळ घेउन तिच्या आईच्या स्वाधीन केले. आणि लगेचच त्या आईने आणि तिथे जमलेल्या जमावाने त्या रिक्षा चालकास आणि मागे बसलेल्या व्यक्तीस चांगलाच चोप दिला. यानंतर त्या रिक्षा चालकास आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीस जमावाने डोंबिवली पोलिसांच्या स्वाधीने केले आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला.
https://prahaar.in/2025/04/30/major-accident-at-varahalaxmi-narasimha-swamy-temple-8-dead-many-injured/
या घटनेचा आढावा घेता पालकांनी आपल्या पाल्याबाबत अधिक सतर्क असणे आवश्यक आहे. हे यावरुन दिसते. हा घडलेला प्रकार पोलिसांना कळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे त्याचबरोबर त्यांची कोनती सक्रिय टोळी यासाठी काम करत आहे का? या संदर्भात देखील त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न डोंबिवली पोलिसांकडुन केला जाात आहे . मात्र या घटनेनंतर प्राथमिक माहिती समोर येत आहे की, काही लोकांकडून सीमा पलीकडून चाईल्ड ट्रॅफिकिंगचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार गुजरात, गोवा, महाराष्ट्र आणि बारताचे काही राज्य या भागात होत आहेत. यामध्ये प्रमुख्याने असे प्रकार मॉल, मार्केट, बुक स्टॅाल्स, वर्दळीचा परिसर, ड्रेस शॉपिंग , खरेदीच्या ठिकाणी असे प्रकार घडण्याचे संकेत वर्तवले जाात आहे.
त्यामुळे आपल्या पाल्यासोबत जात असताना आपल्या मुलांचा हात सोडु नका, त्याना आपल्या समोर उभे करत जा.. की जेणेकरुन अशा प्रकाराला आपल्याला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे कोणत्याही टिकाणी जात असताना घरातील मंडळींसोबत देखील पाठवताना आपल्या पाल्याला देखील समज देणे महत्वाचे आहे. अनोलखी व्यक्तीशी बोलु नये, अदन्यात व्यक्तीकडून काही घेउ नये. या महत्वाच्या बाबीचे प्रशिक्षण मुलांस देणे गरजेचे आहे.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…