Friday, May 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSSC and HSC Result : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १५ मे नाही 'या'...

SSC and HSC Result : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १५ मे नाही ‘या’ तारखेला लागणार दहावी, बारावीचा निकाल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात (SSC-HSC Result) अनेक बातम्या समोर येत आहेत. आज दहावीच्या आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला. यानंतर महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल कधी लागणार (Maharashtra State Board) याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बारावी आणि दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे.

https://prahaar.in/2025/04/30/f-illegal-bangladeshi-pakistanis-are-found-in-ports-jetties-fishing-businesses-conduct-a-thorough-investigation-minister-nitesh-rane/

राज्यातील दहावी (SSC Result) आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बारावी आणि दहावीच्या निकालाची तारीख ठरली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परिक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च तर, दहावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पार पडली. सर्व शिक्षकांनी बोर्डाने दिलेल्या वेळेत उत्तपत्रिकांची तपासणी केली. आता निकाल छपाई सुरू होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी १५ मे २०२५ या तारखेपर्यंत दहावी, बारावीचा निकाल लागणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता ११ मे पर्यंत बोर्डाचा निकाल पूर्ण होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यानुसार बारावीचा निकाल १३ किंवा १४ मे रोजी, तर दहावीचा निकाल १६ मे पूर्वी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण

इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झालीय. ८ दिवसांत गुणांची अंतिम पडताळणी पूर्ण होईल. बारावीचा निकाल १३ किंवा १४ मे तर, दहावीचा निकाल १५ किंवा १६ मे रोजी जाहीर होईल. यासंदर्भातील घोषणा शिक्षणमंत्री लवकरच करतील, असं पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे म्हणाले.

सीआयएससीई, आयसीएसई, आयएससीचा निकाल जाहीर

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशनने बुधवारी आयसीएसई (ICSE) दहावी आणि आयएससी (ISC) बारावी २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर केला. बारावी आयएससी परीक्षा १३ फेब्रुवारी ते ५ एप्रिल दरम्यान आणि दहावी आयसीएसई परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. दहावीचा निकाल ९९.०९ टक्के लागला आहे. दहावीत मुली आणि मुलांच्या उत्तीर्णतेचे अनुक्रमे ९९.३७ टक्के आणि ९८.८४ टक्के एवढे आहे. आयएससी बारावीत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.६४ टक्के एवढे आहे. तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.४५ टक्के आहे. एकूण ९९,५५१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिला होती. त्यातील ९८,५७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -