जयपूर: भारताचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) आज 30 एप्रिल रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. आयपीएल (IPL 2025) सामन्यासाठी जयपूरमध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत रोहितने आपला वाढदिवस साजरा केला. ज्याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे.
जयपूरच्या हॉटेलमध्ये रोहित शर्माच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी रोहितची पत्नी रितिका सजदेह, मुंबई इंडियन्सचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ देखील उपस्थित होते. गुरुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार असून यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ हा जयपूरमध्ये आहे. त्यामुळे जयपूरमध्येच रोहित शर्माच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यात आले.
मुंबई इंडियन्सने शेअर केला व्हिडीओ :
View this post on Instagram
वाढदिवसानिमित्त खास केक
व्हिडिओत रोहितच्या बर्थ डे केकने लक्ष वेधले. वाढदिवसा करता जो केक मागवण्यात आला होता ज्यावर रोहित शर्माचे फोटो सुद्धा होते.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार
रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. सध्या मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवलं गेलं असलं तरी रोहित शर्मा त्याच्या विस्फोटक फलंदाजीने आजही आयपीएलचं मैदान गाजवतोय. त्याचप्रमाणे, रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने वर्ल्ड कप 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत.
रोहित शर्माची आयपीएल कारकीर्द
रोहित शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत 266 सामने खेळले असून यात त्याने 6868 धावा केल्या आहेत. यासह रोहितने स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत आतापर्यंत 15 विकेट सुद्धा घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये रोहितच्या नावावर 45 अर्धशतक तर 2 शतकांचा समावेश आहे. विस्फोटक फलंदाजी करताना रोहितने आयपीएलमध्ये एकूण 297 षटकार तर 617 चौकार ठोकले आहेत. 2009 च्या आयपीएल सीजनमध्ये रोहित शर्माने डेक्कन चार्जेस कडून गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्स विरुद्ध विकेटची हॅट्रिक सुद्धा घेतली होती.
रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
रोहित शर्माने जून 2007 मध्ये रोहितने भारताकडून वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रोहितने आतापर्यंत वनडेत 273 सामने खेळले असून यात 11168 धावा केल्या आहेत. तर 67 टेस्टमध्ये 4302 धावा तर 159 टी 20 सामन्यात त्याने 4231 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने वर्ल्ड कप 2024 विजयानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.