कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधील फलपट्टी मछुआ येथे एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात साधारण १४ जणांचा मृत्यू झालाय. एजन्सीच्या माहितीनुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, मंगळवारी मध्य कोलकातामध्ये फलपट्टी मछुआ येथे एका हॉटेलमध्ये आग लागली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची ही घटना रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. ऋतुराज हॉटेल परिसरात ही घटना घडली. घटनास्थळावरून १४ मृतदेह हाती घेण्यात आले.
#WATCH | Kolkata, West Bengal | A fire breaks out in a building near Falpatti Machhua. Fire tenders present at the spot. Efforts to douse the fire are underway. More details awaited. pic.twitter.com/pmCT6zeGVW
— ANI (@ANI) April 29, 2025
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र पूर्व भारतातील सर्वात गजबजेचा परिसर असलेल्या बुर्राबाजारमध्ये आपातकालीन सेवामध्ये काम करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. आग लागल्यानंतर अनेकांनी इमारतीच्या खिडक्या तसेच मधल्या भिंतींवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.