मुंबई: विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपद देण्यात आलं आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत.
विवेक फणसाळकर यांनी 30 जून 2022 मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा स्वीकारली होती, त्यानंतर ते आज 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर आयुक्तपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा होती. याशिवाय देवेन भारती यांच्याकडेही या पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
कोण आहेत देवेन भारती?
देवेन भारती हे बिहारचे रहिवासी आहेत. बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी असलेल्या भारतीने दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. देवेन भारती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. सुमारे तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी मुंबई पोलिसात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
देवेन भारती यांनी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त, संयुक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), आणि अँटी-टेररिझम स्वॉड (ATS) चे प्रमुख म्हणून काम केले आहे.
देवेन भारती यांचा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासह अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासात समावेश आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मुंबई पोलीस दलात महत्वपूर्ण बदल अपेक्षित आहे.
मुंबई पोलिसांच्या परंपरेनुसार,फणसाळकरां यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यांच्या निवृत्तीनंतर, पोलिस मुख्यालयातील आयपीएस अधिकारी त्यांना निरोप देताना दिसले. एक परंपरा देखील पाळली जाते ज्यामध्ये निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याला उघड्या जीपमध्ये बसवले जाते.
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…