मुंबई: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. अक्षय्य तृतीया यावेळेस आज म्हणजेच ३० एप्रिलला साजरी केली जात आहे. या दिवशी सूर्य आणि चंद्र आपल्या उच्च राशीमध्ये असतील म्हणजेच सूर्य मेष राशीमध्ये असतील. तसेच चंद्रमा वृषभ राशीमध्ये असतील. अक्षय्य तृतीयेचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण या दिवशी दान धर्म अतिशय महत्त्वाचा मानला जातो. दान पुण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.
विष्णू देवाची पुजा करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विष्णू भगवानची पुजा करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची पुजा केली पाहिजे. सोबतच पुजा करताना पिवळ्या रंगाचे कपडे घाला.
सोन्या-चांदीची खरेदी करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. या वर्षी पूर्ण वर्षात घर-सुख समृद्धी मिळते.
नवा बिझनेस सुरू करणे
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नवीन बिझनेस सुरू करणे शुभ मानले जाते. या दिवशी व्यापार सुरू केल्याने प्रगती होते.
गृह प्रवेश आणि गृह निर्माण
या दिवशी नव्या घरात प्रवेश अथवा घर बांधायला घेणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच या दिवशी विवाह करणेही शुभ मानले जाते.
रामरक्षा स्त्रोताचे पठण करा
जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल अथवा घरात वारंवार दुर्घटना घडत असतील तर तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रामरक्षा स्त्रोताचे पठण केले पाहिजे.