मुंबई : अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याचा ‘द भूतनी’ हा चित्रपट १ मे पासून लोकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील ‘आया रे बाबा’ हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. दरम्यान, गाण्याच्या प्रमोशन वेळी संजय दत्तला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची त्याने मजेशीर उत्तर दिली.
“आम्ही तुम्हाला रफ अँड टफ आणि दमदार भूमिकेत पाहात आलो आहोत. मात्र, जीवनात कधी भीती वाटलीये किंवा एखाद्या गोष्टीची भिती वाटलीये, असा कधी क्षण आलाय का?” असा सवाल संजय दत्त यांना विचारण्यात आला होता. यावर संजय दत्तने मजेशीर उत्तर दिलं. या प्रश्नाचे उत्तर देताना संजय दत्त म्हणाला, “मी दोन-तीन वेळेस भूत पाहिले आहेत. एकदा मी निकला देखील बोललो होतो आणि एक माझ्या बिल्डिंगमध्ये कधी कधी लुंगी वाला रात्री २-३ वाजता उभा राहतो. तर असे अनुभव आले आहेत. तेव्हा मी नशेत देखील नव्हतो”
https://prahaar.in/2025/04/30/hitman-rohit-sharmas-birthday-celebration-mumbai-indians-shared-a-video/
“द भूतनी” या चित्रपटात हॉरर, कॉमेडी आणि अॅक्शनचा मसाला पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या स्टोरीमध्ये एक झाड आहे, ज्यामध्ये एक भूतनी (मौनी रॉय) असते. संजय दत्त या “बाबा”च्या भूमिकेत आहे, तो भूताला पळवणारा आहे. चित्रपटात पाच अॅक्शन सीन्स आहेत, ज्यामध्ये संजय दत्त यांनी कोणत्याही बॉडी डबलचा वापर न करता स्वतः स्टंट्स केले आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी, “द भूतनी” चा टीझर रिलीज करण्यात आला होता. टीझरमध्ये संजय दत्त एका श्लोकाचा उच्चार करताना दिसतात, ज्यामुळे एक रहस्यमय वातावरण तयार होते.
टीझरमध्ये झाडावर वसलेली भूतनी आणि संजय दत्त यांच्यातील संघर्षाचे दृश्य दाखवले आहे. “द भूतनी” हा सिनेमा संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एक वेगळा अनुभव देणारा आहे. जर तुम्हाला हॉरर आणि कॉमेडीचा मसाला असलेल्या फिल्म्स आवडत असतील, तर ही फिल्म नक्कीच पाहण्यासारखी आहे.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…