Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीSanjay Dutt : अभिनेता संजय दत्त म्हणतो, मी खरा भूत पाहिलाय अन्...

Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त म्हणतो, मी खरा भूत पाहिलाय अन् तेव्हा मी नशेतही नव्हतो!

मुंबई : अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याचा ‘द भूतनी’ हा चित्रपट १ मे पासून लोकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील ‘आया रे बाबा’ हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. दरम्यान, गाण्याच्या प्रमोशन वेळी संजय दत्तला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची त्याने मजेशीर उत्तर दिली.

“आम्ही तुम्हाला रफ अँड टफ आणि दमदार भूमिकेत पाहात आलो आहोत. मात्र, जीवनात कधी भीती वाटलीये किंवा एखाद्या गोष्टीची भिती वाटलीये, असा कधी क्षण आलाय का?” असा सवाल संजय दत्त यांना विचारण्यात आला होता. यावर संजय दत्तने मजेशीर उत्तर दिलं. या प्रश्नाचे उत्तर देताना संजय दत्त म्हणाला, “मी दोन-तीन वेळेस भूत पाहिले आहेत. एकदा मी निकला देखील बोललो होतो आणि एक माझ्या बिल्डिंगमध्ये कधी कधी लुंगी वाला रात्री २-३ वाजता उभा राहतो. तर असे अनुभव आले आहेत. तेव्हा मी नशेत देखील नव्हतो”

https://prahaar.in/2025/04/30/hitman-rohit-sharmas-birthday-celebration-mumbai-indians-shared-a-video/

“द भूतनी” या चित्रपटात हॉरर, कॉमेडी आणि अ‍ॅक्शनचा मसाला पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या स्टोरीमध्ये एक झाड आहे, ज्यामध्ये एक भूतनी (मौनी रॉय) असते. संजय दत्त या “बाबा”च्या भूमिकेत आहे, तो भूताला पळवणारा आहे. चित्रपटात पाच अ‍ॅक्शन सीन्स आहेत, ज्यामध्ये संजय दत्त यांनी कोणत्याही बॉडी डबलचा वापर न करता स्वतः स्टंट्स केले आहेत.​ महाशिवरात्रीच्या दिवशी, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी, “द भूतनी” चा टीझर रिलीज करण्यात आला होता. टीझरमध्ये संजय दत्त एका श्लोकाचा उच्चार करताना दिसतात, ज्यामुळे एक रहस्यमय वातावरण तयार होते.

टीझरमध्ये झाडावर वसलेली भूतनी आणि संजय दत्त यांच्यातील संघर्षाचे दृश्य दाखवले आहे.​ “द भूतनी” हा सिनेमा संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एक वेगळा अनुभव देणारा आहे. जर तुम्हाला हॉरर आणि कॉमेडीचा मसाला असलेल्या फिल्म्स आवडत असतील, तर ही फिल्म नक्कीच पाहण्यासारखी आहे.​

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -