Thursday, May 8, 2025
Homeक्राईमDombivali Crime : प्रेमाचा भयानक शेवट! वादाला कंटाळून प्रियकराने घेतला प्रेयसीचा जीव

Dombivali Crime : प्रेमाचा भयानक शेवट! वादाला कंटाळून प्रियकराने घेतला प्रेयसीचा जीव

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हत्या किंवा बलात्कारासारख्या गंभीर घटना सातत्याने घडत असल्याचे समोर (Crime News) येत आहे. यामध्ये प्रेम प्रकरणातील घटनांची मोठी संख्या आहे. अशातच डोंबिवली येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुण-तरुणीच्या प्रेमाचा भयानक शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या वादाला कंटाळून प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून जीव घेतल्याची घटना घडली. (Dombivali Crime)

https://prahaar.in/2025/04/30/important-news-for-students-the-results-of-class-10th-and-12th-will-be-declared-on-this-date-not-may-15th/

डोंबिवलीमधील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठवड्यापूर्वी एका इमारतीमधील घरात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर काल मयत तरुणीच्या नातेवाईकांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तरुणीची हत्या (Murder Case) झाल्याचा संशय व्यक्त करत तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात मयत तरुणीचा प्रियकर सुभाष भोईर आरोपी असल्याचा संशय होता. सुभाष भोईर हा या तरुणीसोबत गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. काही महिन्यांपासून या दोघांमध्ये व्यक्तिगत वाद सुरू होते. त्याच वादातून सुभाषने तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि तेथून पळ काढला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजित शिंदे यांनी दिली. (Dombivali Crime)

दरम्यान, पोलिसांना सुत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सुभाष भोईर हा कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी ब्रिजजवळ असल्याची माहिती ल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचने दुर्गाडी किल्ला परिसरात सापळा रचत सुभाष भोईर याला बेड्या ठोकल्या. यावेळी आरोपी पुन्हा पळ काढण्याच्या तयारीत होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

नेमके प्रकरण काय?

ठाकुर्ली येथील सुभाष भोईरचे मृत तरुणीशी प्रेमसंबंध होते, त्यातूनच दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन वर्षापासून हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते. २२ तारखेला या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला, त्यामुळे संतापलेल्या सुभाष भोईर याने या तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घरातून पळ काढला. याप्रकरणी घरात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची पोलिसांना माहिती देण्यात आली. टिळक नगर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल करत पुढील तपास सुरू केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -