Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीRatnagiri News : समुद्रात बोट बुडाली पण 'अल फरदिन'ने वाचवले १६ तरुणांचे...

Ratnagiri News : समुद्रात बोट बुडाली पण ‘अल फरदिन’ने वाचवले १६ तरुणांचे प्राण!

रत्नागिरी : उन्हाळी सुट्टी सुरु झाली असून मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळांवर गर्दी होताना पाहायला मिळत आहे. उष्णतेमुळे समुद्र असलेल्या ठिकाणी पर्यटकांची जास्त पसंती मिळते आहे. अशातच रत्नागिरी जवळ असलेल्या पूर्णगड येथील समुद्रात काही तरुण मौजमजा करण्यास गेले असता बोट उलटल्याचे समोर आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पावस आणि रनपार गावातील १६ तरुण काल (दि २९) सायंकाळच्या सुमारास मौजमजा करण्यासाठी फिनोलेक्स केमिकल जेटी येथून सरस्वती नावाच्या बोटीतून समुद्रात फिरण्यासाठी गेले होते. समुद्र खवळलेला असल्याने बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने बोट पलटी होऊन सर्व तरुण बोटींसोबत पाण्यात पडले. पाण्यात पडलेल्या तरुणांपैकी एकालाही पोहता येत नव्हते.

सुदैवाने जवळच असलेल्या अल फरदिन बोटीवरील तांडेल फरीद ताजुद्दीन तांडेल यांनी या घटनेची गांभीर्यता लक्षात घेवून तात्काळ मदतीला धावले. त्याचवेळी, रत्नागिरी पोलीस दलाचे सागर कवच अभियान अंतर्गत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सिल्वर सन पायलट बोटीवरील पोलीस कर्मचारी मुजावर, विजय वाघब्रे, आणि अपूर्व जाधव यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्व १६ तरुणांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. बाहेर काढलेल्या तरुणांना प्रथमोपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान या दुर्घटनेत सरस्वती नावाची बोट समुद्रात बुडाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -