बनावट नोटा पुण्यात कुठे छापल्या जात होत्या? शिवाजीनगर पोलिसांच्या कारवाईनं उघडली नोटा माफियांची गुपित यंत्रणा! २८ लाखांवर बनावट नोटा जप्त !

Share

पुणे : शिवाजीनगरच्या मध्यवर्ती भागात बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आलं आहे. २८ लाखांहून अधिक बनावट नोटा, २ लाखांहून अधिक खऱ्या नोटा आणि अत्याधुनिक नोटा छपाईसाठी वापरलं जाणारं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. ही संपूर्ण यंत्रणा इतकी व्यावसायिक पद्धतीनं उभी केली गेली होती, की बँकेच्या सीडीएम मशीनलाही हे चलन खऱ्या नोटा समजून स्वीकारत होतं!

१७ एप्रिल रोजी कोटक महिंद्रा बँकेच्या मशीनमध्ये ५५ बनावट २०० रुपयांच्या नोटा सापडल्यानंतर पोलिसांची शंका बळावली आणि सुरू झाला तपास. शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण करत मनिषा ठाणेकर, भारती गवंड आणि सचिन यमगर या तिघांना अटक केली. चौकशीत त्यांनी ‘मास्टरमाइंड’ नरेश शेटटीचं नाव उघड केलं.

https://prahaar.in/2025/04/29/blind-love-or-deceit-why-did-136-girls-suddenly-disappear-from-ahilyanagar/

नरेशच्या लोहगाव येथील घरावर छापा टाकताच खळबळजनक माहिती समोर आली. त्याच्या घरी सापडल्या तब्बल २३.३२ लाखांच्या बनावट नोटा – २०० रुपयांचे २० बंडल, ५०० च्या २३२ नोटा, १११६ प्रिंटेड कागद, प्रिंटर, शाई आणि आणखी सगळं साहित्य. एवढंच नाही तर त्याच्या कारमधूनही ६४८ बनावट नोटा आढळल्या.

याशिवाय आरोपी प्रभू गुगलजेडडी यालाही पोलिसांनी अटक केली. संपूर्ण टोळी बनावट नोटा बाजारात पेरण्यासाठी सुसूत्र योजना आखून काम करत होती.

शिवाजीनगर पोलिसांच्या या कारवाईत सुमारे ३० लाखांचा बनावट चलन साठा, छपाई यंत्रणा आणि पाच आरोपींच्या अटकेसह मोठा कट उध्वस्त करण्यात आला आहे.

Recent Posts

PBKS vs DC, IPL 2025: मोठी बातमी! पाकिस्तान हल्ल्यादरम्यान रद्द झाला पंजाब-दिल्लीचा IPL सामना

धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…

26 minutes ago

Jammu Drone Attack : पाकड्यांची मस्ती काय थांबेना! जम्मूत ड्रोन हल्ला, पठाणकोठमध्ये स्फोट, जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…

60 minutes ago

थेट प्रहार! पाकिस्तानमधील गाणी, सिरीज, चित्रपट भारतात थांबवा!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…

1 hour ago

IND-PAK तणावादरम्यान शिफ्ट झाला IPL चा सामना, आता धरमशाला नव्हे तर या ठिकाणी होणार सामना

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…

1 hour ago

Gold rate: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…

2 hours ago