मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे नाव ‘किंगडम’ असे आहे. त्याचा हा चित्रपट तामिळ, हिंदी आणि तेलगू या भाषेत प्रदर्शित केला जणार आहे. या चित्रपटाचा टीझर आताच काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला आहे.
ज्युनिअर एनटीआरने तेलुगू, रणबीर कपूरने हिंदी तर अभिनेता सूर्याने तमिळ सिनेमाच्या टीझरसाठी आवाज दिला आहे. उद्या सिनेमाचा प्रोमो रिलीज होणार आहे.या चित्रपटात विजयने ज्या अभिनेत्रीसोबत काम केले आहे ती अभिनेत्री छत्रपती संभाजीनगरची असून मराठी कुटुंबात जन्माला आली आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
विजय देवरकोंडासोबत ‘किंगडम’मध्ये झळकणारी ही अभिनेत्री आहे भाग्यश्री बोरसे (Bhagyashri Borse). भाग्यश्रीचा जन्म १९९९ साली छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. भाग्यश्रीच्या जन्मानंतर काही वर्षात तिचं कुटुंब नायजेरियाला शिफ्ट झालं. तिथे तिच्या वडिलांना चांगली नोकरी मिळाली. नायजेरियातील ‘लेगोज’ शहरात तिने शालेय शिक्षण घेतलं. सात वर्ष नायजेरियात राहिल्यानंतर ती मुंबईत आली. इथे तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. शिक्षण घेतानाच ती मॉडेलिंगही करत होती. तिचा कॅमेरा प्रेझेन्स चांगला असल्याने अनेकांनी तिला अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. भाग्यश्रीने काही जाहिरातींमध्ये काम केलं. नंतर ती बॉलिवूडमध्ये आली. भाग्यश्रीने ‘यारियां’ आणि ‘चंदू चॅम्पियन’ मध्ये काम केलं आहे.
हिंदीत नशीब आजमावल्यानंतर भाग्यश्री साऊथमध्ये शिफ्ट झाली. गेल्या वर्षीच ती रवी तेजासोबत ‘मिस्टर बच्चन’ सिनेमात झळकली. लवकरच तिचा ‘कांता’ सिनेमा येणार आहे ज्यामध्ये ती दुलकर सलमानसोबत दिसणार आहे. भाग्यश्रीच्या वडिलांना सिनेमांचं वेड आहे. वडिलांसोबत बसून तिने राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांचे सिनेमे पाहिले आहेत. तेव्हापासूनच तिला सिनेमाविषयी आकर्षण होतं. आता ‘किंगडम’मध्ये भाग्यश्रीला पाहण्याची चाहत्यांचा उत्सुकता आहे. पुढील महिन्यात ‘किंगडम’ रिलीज होणार आहे. सध्या भाग्यश्री नवी नॅशनल क्रश म्हणून उदयास येत आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…