पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन २५ पर्यटकांची आणि एका स्थानिकाची हत्या अतिरेक्यांनी केली. या घटनेने पूर्ण देश हादरला. जगभरातून अतिरेक्यांच्या विरोधात कठोर कारवाईसाठी भारताला जाहीर पाठिंबा मिळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती हाती आली आहे.
कोण आहेत लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा, ज्यांच्याकडे आहे मोठी जबाबदारी
सैन्य दलांत तीन महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या पहलगाम हल्ल्यात सहभागी झालेला एक अतिरेकी हा मूळचा पाकिस्तानच्या लष्करातील एसएसजी कमांडो होता. जम्मू काश्मीर पोलिसांनी पहलगाम हल्ल्यानंतर अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यात हाशिम मुसा नावाच्या अतिरेक्याचे चित्र आहे. तोच हा अतिरेकी आहे. हाशिम मुसा हा मूळचा पाकिस्तानच्या लष्करातील एसएसजी (स्पेशल सर्व्हिस ग्रुप) कमांडो होता.
दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावले खडे बोल, संयुक्त राष्ट्रांमध्ये घेतली हजेरी
मुसा हा पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल फोर्सचा माजी पॅरा कमांडो आहे. लष्करी सेवेतून बाहेर पडल्यानंतर मुसा लष्कर – ए – तोयबा या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात आला. कलम ३७० हटवल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये आर्थिक प्रगती सुरू आहे. या प्रगतीत अडथळा निर्माण करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरच्या पर्यटनाला ब्रेक लावण्यासाठी अतिरेक्यांनी पहलगाम येथे पर्यटकांनाच लक्ष्य केले.
पर्यटकांना ठार करण्याआधी अतिरेक्यांना पाकिस्तानच्या लष्कराकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळेच अतिरेक्यांनी सहजतेने गोळीबार करुन पर्यटकांना लक्ष्य केले. अतिरेकी हल्ल्यासाठी पाकिस्ताननेच आर्थिक मदत दिली होती. या व्यतिरिक्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या १५ जणांनी अतिरेक्यांना स्थानिक पातळीवर हवी ती मदत पुरवल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास आता एनआय करत आहे.