Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीGautam Adani : गौतम अदानींना दिलासा! अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणात मिळाली क्लीन चिट

Gautam Adani : गौतम अदानींना दिलासा! अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणात मिळाली क्लीन चिट

नवी दिल्ली : भारताचे दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर अमेरिकन न्यायालयाने लाचखोरी प्रकरणाबाबत दोषी ठरवले होते. याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून अटक वॉरंट देखील जारी करण्यात आले होते. या प्रकरणामुळे अदानी समुहाला मोठ्या अडचनींचा सामना करावा लागला होता. मात्र आता अमेरिकेत सुरू असलेल्या लाचखोरी प्रकरणात (US bribery case) आघाडीचे उद्योगपती अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांची कंपनी अदानी ग्रीन एनर्जीला मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद!

अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणाबाबत स्वतंत्र पुनरावलोकनात त्यांच्याविरुद्ध कोणतीही अनियमितता आढळली नसून, अदानी ग्रुपने सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. याबाबत कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, ‘स्वतंत्र चौकशीनंतर अदानी ग्रीन किंवा त्यांच्या सहयोगी कंपन्यांनी कोणत्याही नियमांचे किंवा कायद्यांचे उल्लंघन केले नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्याचबरोबर अदानी कंपनी भविष्यातही सर्व नियम आणि कायदे पाळत राहील’, असेही म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय?

भारतीय वीज प्रकल्पाचा करार मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोपाखाली नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि अदानी ग्रीनचे व्यवस्थापकीय संचालक विनीत एस. जैन यांना अटक केली होती. निधी उभारताना अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. या आरोपांअंतर्गत, अदानी ग्रुपवर २३६ दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप होता. दरम्यान, या प्रकरणाचा अदानी समुहाचे शेअरर्स धडाधड कोसळले असून केनियाने अदानींशी संबंधित प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे अदानी समूहाला मोठा फटका बसला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -