Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडी१००, २०० रूपयांच्या नोटांबाबत RBIचा मोठा निर्णय

१००, २०० रूपयांच्या नोटांबाबत RBIचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: तुम्ही जेव्हा एटीएममधून पैसे काढायला जाता तेव्हा बऱ्याचदा एटीएममधून ५००च्याच नोटा येतात. मात्र आता या समस्येवर भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे आणि एटीएममधून १०० तसेच २००च्या नोटाही असाव्यात असे बँकांना आदेश दिले आहेत.

१००-२००च्या नोटांची उपलब्धता वाढवणे गरजेचे

केंद्रीय बँकेने सोमवारी बँकांना आदेश देताना म्हटले की, सामान्य जनतेला नोटांची उपलब्धता करून देण्यासाठी एटीएममध्ये पुरेशा नोटा असणे गरजेचे आहे. आरबीआयने यासंबंधी सर्कुलर जारी केले आहे. यात म्हटले आहे की बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना हे आदेश टप्प्याटप्प्याने लागू करावे लागतील.

काय लिहिलेय आरबीआयच्या सर्कुलरमध्ये?

यात म्हटले आहे की सर्रास वापरल्या जाणाऱ्या या मूल्यवर्गाच्या बँक नोटा जनतेपर्यंत अधिकाधिक पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एटीएममधून नियमितपणे १०० आणि २०० रूपयांच्या नोटाही बाहेर पडतील याची पडताळणी देशातील सर्व बँकांनी तसेच व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सनी करणे गरजेचे आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सर्व एटीएममधील ७५ टक्के एटीएममधून कमीत कमी एका क२सेटमधून १०० रूपये अथवा २०० रूपयांच्या नोटा निघाल्या पाहिजेत. यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३१ मार्च २०२६ पर्यंत ९० टक्के एटीएममधून कमीत कमी एका कॅसेटमधून १०० आणि २०० रूपयांच्या नोटा निघाल्या पाहिजेत.

१ मेपासून एटीएम असणार महाग

१ मे २०२५ पासून देशात बदलणाऱ्या नियमानुसार एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमातही बदल होणार आहे. होम बँक नेटवर्कच्या बाहेरील कोणत्याही एटीएम मशीनमधून ट्रान्झॅक्शन केले जात असेल अथवा बॅलन्स चेक केल्यास युजरला अधिक पैसे द्यावे लागतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -