Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीJammu Kashmir Tourism : पर्यटकांनो 'इथे' फिरण्याचे नियोजन असेल तर आजच रद्द...

Jammu Kashmir Tourism : पर्यटकांनो ‘इथे’ फिरण्याचे नियोजन असेल तर आजच रद्द करा!

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांची घरे उद्ध्वस्त केली असून सुमारे दोन हजार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे, दक्षिण काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार पर्यटकांच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले आहे. त्यामुळे काश्मीरमधील ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात दहशतवादाविरुद्ध सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच आहे. या लष्करी कारवाईदरम्यान, सरकारने काश्मीर खोऱ्यातील ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद केली आहेत. काश्मीरमधील ८७ पैकी ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीर सरकारने दहशतवादाविरुद्धची शोध मोहीम आणि सुरक्षा आढावा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही पर्यटन स्थळे तात्पुरती बंद आहेत आणि सुरक्षेच्या परिस्थितीनुसार त्यांचा आढावा घेतला जाईल.

Bandra Linking Road : वांद्रे येथील क्रोमा शो रूममध्ये अग्नितांडव

पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात काही स्लीपर सेल सक्रिय झाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली आहे. या स्लीपर सेल्सना कारवाई सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात सक्रिय दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवादी मोठ्या आणि अधिक प्रभावी हल्ल्याची योजना आखत आहेत, असे गुप्तचर अहवालांवरून दिसून आलं आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी गुलमर्ग, सोनमर्ग आणि दाल लेक परिसरांसह संवेदनशील पर्यटन स्थळांवर सुरक्षा तैनात केली आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुपमधील अँटी फिदायीन पथके तैनात केली आहेत.

दरम्यान, काश्मीर खोऱ्याला भेट देण्याची योजना आखणाऱ्या पर्यटकांनी सूचनांबद्दल माहिती घ्यावी आणि सावधगिरी बाळगावी असा सल्ला देण्यात आला आहे. पर्यटकांनी सुरक्षा कारवाया असलेल्या भागात जाणे टाळावे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे. रिअल-टाइम अपडेट्ससाठी, प्रवासी अधिकृत सरकारी चॅनेल आणि स्थानिक वृत्तसंस्थांचा संदर्भ घेऊ शकतात, असेही सुरक्षा दलांकडून कडून सांगण्यात आले आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -