Categories: पालघर

सरकारी अनास्थेमुळे आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर; मोखाड्यात पुन्हा बालमृत्यू, मातामृत्यूचे वाढते प्रमाण

Share

मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वीच एका मातामृत्यूने हादरलेल्या मोखाडा तालुक्यात पुन्हा बालमृत्यू झाल्याचे समोर आले. तालुक्यातील किनिस्ते ग्रामपंचायत मधील योगिता सचिन पुजारी या मातेने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात शुक्रवार दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता एका सदृढ बालकाला जन्म दिला. जन्मावेळी बालकांचे वजन ३ किलो असल्याचे सांगण्यात आले. मात्र यानंतर सायंकाळी त्या बालकाला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने त्याला जव्हार कुटीर रुग्णालय येथे हलविण्यात आले. मात्र त्याठिकाणी सुद्धा आयसीयूची सुविधा नसल्याने त्याला नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र नाशिक जिल्हा रुग्णालयात पोहचताच काही मिनिटांतच त्या बालकाला मृत घोषित केल्याचे पालकांनी सांगितले. यामुळे पुन्हा एकदा मोखाडा तालुक्यात एका बालकाचा मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्था आणि दररोजच्या घोषणा करणाऱ्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दोन महिन्यापूर्वी तालुक्यातील एका मातेला मोखाड्याहून जव्हार आणि तेथून नाशिक असा जीव वाचवण्यासाठी १०० किमीचा प्रवास करावा लागला होता. मात्र तरीही तिचा जीव वाचला नव्हता. आता पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली असून आता मात्र एका बालकाला अती दक्षता विभाग मिळवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी पुन्हा १०० किमीचा प्रवास करावा लागला.

मोखाडा तालुक्यात कुपोषण बालमृत्यू मातामृत्यू या घटना वाढत असताना आजही कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध न होणे, बालरोग तज्ज्ञांची भरती होणे, माता किंवा बालके यांच्यासाठी अती दक्षता विभाग उपलब्ध नसणे असे गंभीर चित्र कायम आहे. यामुळे जव्हारसह मोखाडा तालुक्यातील नागरिकांना आजही उपचारासाठी नाशिक किंवा वापी याठिकाणी स्थानांतर व्हावे लागत आहे.

“ त्या बालकाला श्वास घेण्यास त्रास झाल्याने जव्हार येथे हलवण्यात आले होते मात्र येथेही त्याला ऑपरेट करणे शक्य न झाल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. मात्र कदाचित श्वास नलिका आणि हृदयासंबंधी काही आजार जन्मत असावेत असा अंदाज आहे.” -डॉ. भरत महाले, वैद्यकीय अधीक्षक, मोखाडा ग्रामीण रुग्णालय

” आमचे बाळ सुखरुप जन्म घेतल्याने आम्ही सगळे खुश होतो, मात्र संध्याकाळी अचानक आम्हाला बाळाची तब्बेत खराब होत असल्याचे सांगून जव्हार येथे नेण्यात आले. तिथे चार-पाच तास ठेवून नाशिकला पोहचताच नाशिक येथील डॉक्टरांनी पाच मिनिटात आम्हाला सांगितले की बाळ गेले आहे. तिथे पोहचेपर्यंत बाळ रडत होते. ३ किलो वजनाचे बाळ असून सुद्धा काही तासांत कसा जीव सोडला हे आम्हाला सांगायला हवे. तसेच पाठवलेल्या रुग्णवाहिकेत डॉक्टर सुद्धा नव्हते. यामुळे याची चौकशी व्हायला हवी.” – सचिन पुजारी, मृत बालकांचे वडील

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

23 minutes ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

33 minutes ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

53 minutes ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

1 hour ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

1 hour ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

2 hours ago