Thursday, May 8, 2025
Homeक्रीडाIPL 2025DC vs KKR, IPL 2025: कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सला १४ धावांनी हरवले

DC vs KKR, IPL 2025: कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सला १४ धावांनी हरवले

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४८व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्सने दिल्लीचा १४ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात कोलकाताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २०४ धावा केल्या होत्या. मात्र दिल्लीच्या संघाला १९० धावाच करता आल्या.

२०५ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या दिल्लीची सुरूवात चांगली झाली नाही. पहिल्या षटकातील दुसऱ्याच बॉलवर अभिषेक पोरेलला अनुकूल रॉयने बाद केले. यानंतर ५व्या षटकांत करूण नायरनेही आपली विकेट गमावली. वरूणने १५ धावा केल्या. यानंतर केएल राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र लोकेश राहुल ७व्या षटकांत धावबाद झाला. राहुलने केवळ ७ धावा केल्या. अक्षर पटेल आणि फाफ डू प्लेसिस यांच्यात चांगली भागीदारी झाली. मात्र नरेनने अक्षऱला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अक्षरने ४३ धावांची खेळी केली. यानंतर फाफ डू प्लेसिसवर आशा टिकून होत्या. मात्र तोही ६२ धावांवर बाद झाला. एकामागोमाग एक धक्के बसल्यानंतर दिल्ली काही सावरली नाही. अखेरीस दिल्लीचा डाव १९० धावांवर आटोपला आणि कोलकाताने हा सामना जिंकला.

तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकाताची या सामन्यात सुरूवात जबरदस्त झाली. गुरबाज आणि सुनील नरेनने कमालीची सुरूवात करून दिली. मात्र तिसऱ्या षटकांत ४८ च्या स्कोरवर गुरबाजची विकेट पडली. यानंतर रहाणेने मोर्चा सांभाळला. ८५ धावसंख्येवर असताना कोलकाताने नरेनची विकेट गमावली. यानंतर ८व्या षटकांत रहाणेची विकेट पडली. रहाणे २६ धावा करून बाद झाला. अय्यर पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. त्याने केवळ ७ धावा केल्या. १० षटकानंतर केकेआरची धावसंख्या ४ बाद ११७ होती. यानंतर अंगकृष आणि रिंकु सिंह यांच्यात चांगली भागीदारी झाली. मात्र ६१ धावांची भागीदारी १७व्या षटकांत तुटली. अंगकृष ४४ धावा करून बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकांत रिंकु सिंहही बाद झाला. त्याने ३६ धावा केल्या. शेवटचे षटक हे दिल्लीसाठी भारी ठरले. मिचेल स्टार्कने हे षटक टाकले. त्याने या षटकांत तीन विकेट मिळवल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -