मुंबई(ज्ञानेश सावंत):अठराव्या हंगामातील पात्रता फेरीतील चढाओढ सध्या सुरू आहे. प्रत्येक संघ पात्रता फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कालच्याच सामन्यात दिल्लीचा बेंगळुरूने ६ बळीनी पराभव केला. गुण तक्त्यात दिल्ली चौथ्या स्थानावर आहे व आजचा सामना जिंकणे त्यांना आवश्यक आहे. आजचा सामना घरच्या मैदानावर कोलकत्ता विरुद्ध होणार आहे.
कोलकत्याचा यापूर्वीचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला व त्यांना एक गुण मिळाला. कोलकत्त्याला देखील त्यांचे पात्रता फेरीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. कोलकत्त्याचा संघ फलंदाजीमुळे अडचणीत येत आहे. सलामीला डी-कॉक व गुरबाज चालत नाही आहेत तर मधल्या फळीत व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, मोईन अली हे सारेच खेळाडू एक मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहेत.
आजचा सामना जिंकायचा असेल तर कोलकत्त्याला संघात काही बदल करावे लागतील. कोलकत्या समोर दिल्लीचा संघ नक्कीच ताकदवान आहे. त्यांची फलंदाजी, गोलंदाजी ही कोलकत्ता पेक्षा चांगली आहे. आणखी एक गोष्ट दिल्लीच्या संघात आहे ती म्हणजे ते रिस्क घ्यायला घाबरत नाहीत. गरजे नुसार ते त्यांच्या गोलंदाजी व फलंदाजी मध्ये बदल करतात. चला तर बघूया दिल्ली कालचा पराभवाचा बदला आज घेणार का?
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
View Comments
दिल्ली vs कोलकाता: आजचं महत्त्वपूर्ण सामना! 🔥
दिल्लीला आजच्या सामन्यात विजय मिळवण्याची अत्यंत आवश्यकता आहे, आणि ते घरच्या मैदानावर कोलकात्याशी भिडणार आहेत. कोलकत्ता संघर्ष करत असले तरी त्यांना आपल्या फलंदाजी सुधारण्याची गरज आहे. दिल्लीचा संघ आजचा पराभव सुधारून विजयी होईल का? 🏏💥 #DCvsKKR #IPL2025 #Playoffs