Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीMaharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद!

Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद!

‘असे’ असतील पर्यायी मार्ग

मुंबई : भाषिक राज्याच्या स्थापनेचे स्मरण म्हणून दरवर्षी १ मे रोजी ‘ महाराष्ट्र दिन’ (Maharashtra Day) साजरा केला जातो. यंदाही राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबईतील दादर येथे १ मे रोजी परेड घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी वाहतुकीत (Mumbai Traffic Police) मोठे बदल केले आहेत. याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना देखील जारी केली आहे.

https://prahaar.in/2025/04/29/terrorist-who-carried-out-the-pahalgam-attack-was-an-ssg-commando-in-the-pakistan-army/

मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथे केले जाणाऱ्या परेडनिमित्त सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत परिसरातील काही रस्ते बंद केले जाणार आहेत. यावेळी काही पर्यायी मार्ग उपलब्ध केले असून नागरिकांनी सूचनेचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

कोणते रस्ते बंद ?

  • केळुस्कर रोड दक्षिण आणि उत्तर : निमंत्रित वगळता सर्व वाहनांसाठी बंद
  • एसके बोले रोड (सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगीज चर्च जंक्शन) : एकेरी वाहतूक.
  • स्वतंत्रवीर सावरकर रोड (सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शन) : प्रवेश प्रतिबंधित.

काय आहेत पर्यायी मार्ग?

  • पश्चिम उपनगरांकडे जाणारी वाहतूक सिद्धिविनायक जंक्शनवरून एसके बोले रोड, पोर्तुगीज चर्च, गोखले रोड, एलजे रोड आणि राजा बडे चौक मार्गे वळवली जाईल.
  • दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक पांडुरंग नाईक रोड, राजा बडे चौक, एलजे रोड आणि गोखले रोड मार्गे वळवली जाणार आहे.

या ठिकाणी नो पार्किंग झोन

  • केळुस्कर रोड (दक्षिण आणि उत्तर)
  • पांडुरंग नाईक रोड
  • एनसी केळकर रोड (गडकरी चौक ते कोतवाल गार्डन)

दरम्यान, जर नागरिकांना कार पास नसेल तर प्लाझा सिनेमा आणि जेके सावंत रोड, दादर (पश्चिम) जवळील कोहिनूर पार्किंग लॉटचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पार्किंग झोन

  • स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह
  • वनिता समाज हॉल
  • महात्मा गांधी स्विमिंग पूल
  • कोहिनूर पीपीएल
  • एनसी केळकर रोड

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -