RR vs GT, IPL 2025: वैभवच्या धावांचे वादळ, राजस्थानचा गुजरातवर ८ विकेट राखत विजय

Share

जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत विजय मिळवला आहे. गुजरातने राजस्थानसमोर विजयासाठी २१० धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर राजस्थानने हे आव्हान १५.५ षटके आणि ८ विकेट राखत पूर्ण केले.

राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला वैभव सूर्यवंशी.  वैभवने ३८ बॉलमध्ये ७ चौकार आणि ११ षटकारांच्या जोरावर १०१ धावा ठोकल्या. सलामीवीर यशस्वी जायसवालनेही ७० धावांची जबरदस्त खेळी केली. यामुळेच राजस्थानला १५.५ षटकांत हे इतके मोठे आव्हान गाठता आले.

तत्पूर्वी टॉसनंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या गुजरातची सुरूवात शानदार राहिली. शुभमन गिल आणि साई सुदर्शनने प्रत्येक गोलंदाजाला झोडून काढले. गिलने आक्रमक फलंदाजी केली आणि २९ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. दुसरीकडून सुदर्शननेही चौकार-षटकारांचा पाऊस केला. १० षटकांत गुजरातची धावसंख्या बिनबाद ९२ होती. ११व्या षटकांत गुजरातला पहिला झटका बसला तो म्हणजे साई सुदर्शन बाद झाला. त्याने ३९ धावांची खेळी केली.

यानंतर बटलर आणि गिलने मोर्चा सांभाळला. दोघांनी जोरदार फलंदाजी केली. १५व्या षटकांत गुजरातची धावसंख्या दीडशेपार गेली. १७व्या षटकांत गिलची विकेट पडली. गिलने ५० बॉलमध्ये ८४ धावांची खेळी केली. यानंतर बटलरनेही अर्धशतक ठोकले. याच्या जोरावर गुजरातने राजस्थानसमोर विजयासाठी २१० धावांचे आव्हान ठेवले.

View Comments

  • राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत शानदार विजय मिळवला! 💥 वैभव सूर्यवंशीच्या तुफानी शतकाने RR ने २१० धावांचा मोठा टार्गेट १५.५ षटकारात पूर्ण केला! 😲🔥 यशस्वी जायसवालनेही दमदार ७० धावा केल्या! 👏 गुजरातच्या शुभमन गिलने ८४ धावा केल्या, पण RR च्या आक्रमक खेळीपुढे तो कमी पडला! 🏏

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

2 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

2 hours ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

2 hours ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

5 hours ago