मुंबई मेट्रो व्यवस्थेला मिळाले आर्थिक पाठबळ

Share

प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणाऱ्या उत्पन्नात तिप्पट वाढ

मुंबई (प्रतिनिधी) : सार्वजनिक परिवहनाच्या आर्थिक मॉडेलमध्ये नवा मापदंड निश्चित करत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०२४-२५ या आर्थिक वर्षात नॉन-फेअर रेव्हेन्यूमध्ये (प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न) तिप्पट म्हणजेच जवळपास १२२ कोटीची भरघोस वाढ नोंदवली उहे. गेल्या वर्षीच्या ४२.५ कोटी या उत्पन्नात यंदा थेट १८७ टक्के वाढ झाली आहे. या विक्रमी वाढीमुळे एमएमआरडीएने स्वयंपूर्ण, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रवाशांना सुलभ सेवा देणारी मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.

एमएमआरडीएचा एकूण ऑपरेशनल रेव्हेन्यू (क्रियात्मक उत्पन्न) १९० फोटोंवरून वाढून बेट २९२ कोटींवर पोहोचला. म्हणजे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ठरवलेले २०० कोटींचे लक्ष्य मोठ्या फरकाने ओलांडण्यात आले आहे. २०२४ २५ या आर्थिक वर्षातील नॉन-फेअर रेव्हेन्यू (तिकिटाव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न) मधील प्रमुख ठळक बाची ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) परवाना शुल्क-६१.७२ कोटी, स्थानकांवरील जाहिराती २३.९५ कोटी, गाड्यांवरील (आतील आणि बाहेरील) जाहिराती-७.४७कोटी, खाजगी रिटेल आऊटलेट्स आणि किऑस्क ८.२२ कोटी, स्थानक नामकरण व ब्रेडिंग अधिकार ९.७६ कोटी, कर्मचाऱ्यांचे कार्यक्षम व्यवस्थापन-५.४३ कोटी, टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर उत्पन्न-४.५२ कोटी इतर उत्पन्न (चित्रीकरणाची परवानगी, स्मॉल सेल, प्रमोशन्स) ०.६५ कोटी प्रवासी भाड्यांतून मिळणारे उत्पन्न १४७ कोटींवरून वाढून १७० कोटीवर पोहोचले असून, ही १५.६ टक्क्यांची वाढ आहे.

यासोबतच नॉन-फेअर रेफेन्यू (तिकीटाव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न) मध्ये झालेली झपाट्याने वाढ ही सार्वजनिक परिवहन व्यवस्था दीर्घकालीन मूल्य निर्माण करताना परवडणारे दर कायम ठेवत कशी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते, यामध्ये घडलेल्या मूलभूत बदलाचे स्पष्ट संकेत देते आणि भविष्यात उपयुक्त ठरणारी यंत्रणा कशी उभी राहू शकते, माचे स्पष्ट उदाहरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘एमएमआरडीएच्या उल्लेखनीय आर्थिक कामगिरीतून महाराष्ट्राला कार्यक्षम, सर्वसमावेशक आणि शाश्वत शहर वाहतुकीचा आदर्श बनवण्याचे आमचे उद्दिष्ट अधोरेखित होते. नवकल्पनांवर आधारित मॉनिटायझेशन (उत्पन्ननिर्मिती) आणि कार्यक्षम संचालनाच्या माध्यमातून आम्ही जागतिक दर्जाची आणि प्रवाशांना प्राधान्य देणारी मेट्रो व्यवस्था विकसित करत आहोत.’ उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले, “नॉन-फेअर रेव्हेन्यूमधील तिप्पट वाढ हे आर्थिक यश तर आहेच, त्याचप्रमाणे सातत्याने प्रगती करणारी, आधुनिक मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या आमच्या व्हिजनचे योतक आहे. मुंबईकरांसाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आणि शहरी जीवनमानाचा दर्जा वाढविण्याच्या एमएमआरडीएची दृढ बांधिलकी यातून दिसून येते.” एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, “एक उत्तम प्रकारे आखलेल्या नॉन-फेअर बॉक्स रेव्हेन्यू (एनएफवी आर) धोरणामुळे महसूलातील हे उल्लेखनीय लक्ष्य साध्य करणे शक्य झाले.

या धोरणाला राज्य सरकारचाही भक्कम पाठिंबा लागला. मेट्रोचे भाडे लोकांसाठी परवडणारे ठेवूनही आम्ही २०० कोटीच्या उत्पन्नाचे लक्ष्य पार करून २९२ कोटींचे उत्पन्न साध्य केले. एमएमएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अगरवाल म्हणाल्या, ‘आर्थिक शाश्वतता (उत्पन्न व खर्चाचे योग्य संतुलन राखत वित्तीय सुरक्षेची स्थिती कायम ठेवणे) आणि धोरणात्मक नियोजनाबर सातत्याने भर दिल्यामुळे या वर्षी आम्हाला नॉन-फेअर बॉक्स रेकेन्यूमध्ये तिप्पट वाढ साध्य करता आली. टेलिकॉम मत्तांचे मॉनिटायझेशन, रिटेलमधील संधी, ब्रेडिंगचे अधिकार इत्यादीच्या माध्यमातून, कोणत्याही आव्हानावर मात करत कार्यक्षमतेने सुरू राहू शकणाऱ्या आणि उच्च कार्यक्षमतेने व कमी खर्चात नागरिकांना सेवा प्रदान करू शकणाऱ्या मेट्रो व्यवस्थेची पायाभरणी करत आहोत.’

Recent Posts

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

4 minutes ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

17 minutes ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago