पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म विचारुन हत्या करण्यात आली. या अतिरेकी हल्ल्यासाठी स्थानिकांनी अतिरेक्यांना मदत केली. अतिरेक्यांच्या हल्ल्यात २५ हिंदू पर्यटक ठार झाले. याव्यतिरिक्त एक स्थानिक पर्यटकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ठार झाला.
सुरक्षा पथकाने अतिरेक्यांच्या मदतनिसांना शोधण्यासाठी १५०० पेक्षा जास्त नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या चौकशीतून अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी शोधले आहे. अतिरेक्यांना १५ जणांनी मदत केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलीस सखोल तपास करत आहेत. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याआधी सुरक्षा पथकाने दहा स्थानिक अतिरेक्यांची घरे उद्ध्वस्त केली. यात लष्कर – ए – तोयबाचा आदिल हुसेन ठोकर, झाकीर अहमद गनई, अमीर अहमद दार आणि आसिफ शेख, शाहिद अहमद कुट्टे, अहसान उल हक अमीर, जैश-ए-मोहम्मदचा अमीर नझीर वाणी, जमील अहमद शेर गोजरी, द रेझिस्टन्स फ्रंटचा अदनान सफी दार आणि फारूक अहमद तेडवा यांचा समावेश आहे.
पोलिसांनी अतिरेकी हल्ला प्रकरणात एकूण चार रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. अतिरेकी स्थानिकांच्या सहकार्याने हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले. स्थानिकांची मदत होती त्यामुळे अतिरेकी प्रत्यक्ष हल्ला सुरू करेपर्यंत शस्त्र सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवण्यात यशस्वी झाले होते. या प्रकरणात अतिरेक्यांच्या मदत केल्याचे सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…