Share

पूजा काळे

मराठी भाषा कायम आपली सुसंस्कृत संस्कृती जपत आलीय. अलंकारी भाषा, प्राचीन संस्कृती याचे उदाहरण म्हणजे माझा महाराष्ट्र देश. भूक शमवणाऱ्या कांदाभाकरी प्रमाणे ताई, माई, आईच्या गोकुळात नांदणार घरकुल ज्याच्या भिंती मायेच्या स्पंदनाने भारलेल्या आहेत. स्वागताचे दरवाजे आलिंगन देण्यास सरसावलेले आहेत. मराठी भाषेचे बाळकडू प्यायलेले आम्ही, आमच्या नसानसांत मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान आहे. ‘एका बीजापोटी फळे कोटी कोटी’ या अर्थाने प्राचीन भाषा संतांच्या महत्प्रयासाने विकसित झाली. मौखिक आणि लिखित स्वरूपातली भाषा संवादाचे एक माध्यम बनली. परस्पर संबंध वृद्धिंगत करणे भाषेचे महत्त्वाचे कार्य असल्याने पिढीजात संस्काराचे महत्त्व अबाधित ठेवणारी भाषा ही संस्कृतीच्या रथचक्राचे सारथ्य करू लागली. नात्यामधली विविध चक्रं रथचक्राला जोडली जात असताना ज्ञानदान, कर्तव्य, नैतिकता, भावना यामध्ये भाषानिर्मितीची स्वप्न फलद्रुप होताना दिसू लागली.

जन्माबरोबर आलेली मातृभाषा त्यातील यमक, व्यंजन, उपमा, विशेषण यांचा श्री. गणेशा माझ्या घरापासूनचं झाला. भाषेसोबत संस्कारही उतरले माझ्या मनावर. खडूच्या कोऱ्या पाटीवरल्या रेघोट्या म्हणजे माझ्या आयुष्यातील भाषेचा पहिला वर्ग. आजी, पणजीच्या अंगाईतल्या जिजाबाई, रमाई, झासी यांच्या प्रेरणादायी कथांनी चिऊकाऊच्या गोष्टींनी, सणावाराचे महत्त्व, बडबडगीत यांनी झोपेवर घातलेले पांघरूण, गोधडीतली उब अजूनही जाणवते मला. माझा जन्म मूळचा गिरगावचा. आमची साखर झोप म्हणजे पहाटेस येणारा पाण्याचा नळ आणि वासुदेवाची स्वारी, जी आमची स्वतंत्र ऊर्जा होती. महिलावर्ग संस्काराच्या सततच्या पायवाटेवर भाषेचे रांजण भरताना, आमच्या बालमनावर शिक्कामोर्तब करत. नवचैतन्यरूपी सकाळी हरिपाठाचे अभंग, टाळांचा जयघोष पंढरपूरच्या वारीचा भास घडवे. एकात्मिक भाव घेऊन लहानाची मोठी होताना, अभ्यासापासून सुरू झालेला शब्दनाद आनंदे रंगू लागला होता. मुखोद्गत असलेली भजनं, श्रावणातील ग्रंथपारायण शब्दकळांचे उन्नयन करत होता. आजीसोबत मनाचे श्लोक, रामरक्षा तोंडपाठ झालेले. झाडू, वेणी, फणी करताना बाराखडीच्या मदतीने आईने शिकवलेला स्वयंपाक आज कामाला येतोय. कधीकधी मावशीची चमत्कारिक वाक्य ऐकताना हसू येई. संस्कृत भाषेत काहींचे संकेत असल्याने गमतीचे अनुभव येत. अशा या संपन्न मराठी भाषेचा वापर फार पूर्वी कमी शिकलेल्या स्त्रिया चतुराईने करत. म्हणजे, पी हळद हो गोरी, चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे, उंटावरून शेळ्या हाकणे, नाव मोठे लक्षण खोटे, पायातली वहाण पायी बरी. तेव्हा त्याचे अर्थ कळत नसत पण भाषेतली मार्मिकता उमगे. सतत कानावर पडणाऱ्या अभंग रचना, तालबद्ध वाजणारा तानपुरा, बासरीचे संस्कार माझ्या मेंदूत चपखल बसले होते. जात्यावरच्या दळणकांडात, बहिणाबाईंची ओवी गुंतणाऱ्या आईच्या मंजुळ शब्दांनी माझी भाषिक समृद्धता वाढत होती. आजूबाजूच्या इतर बोलीभाषांमुळे भाषांचा जंगी फड चाळीत ऐकायला मिळे. लग्न, हळदीच्या रूपाने गीताला पारंपरिक साज चढे. दिवाळी, दसरा या सारख्या कार्यक्रमातून निबंध स्पर्धा, एकपात्री प्रयोग, स्मरणशक्ती स्पर्धा या अन्वये भाषाविकास पालवीला उमाळे फुटत. पुढे वत्कृत्वाच्या जोरावर शाळा, कॉलेजमध्ये पुस्तक रूपाने, माझं भाषाज्ञान वाढत होते. मराठी कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या अनेक मुली, मुले

अशा प्रकारच्या सरावाने, अभ्यासाने मोठ्या होत गेल्या. अंतर्भूत कलागुण दुसऱ्या पिढीकडे जाताना संस्कार फळाला येत होते. लावणी बाजाची ओळख नव्याने होत होती. सवाल-जवाब, ढोलकीची थाप सगळं अलौकिक होतं. या संस्कार प्रवाहात घरापासून दारापर्यंत संस्कृतीचे निशाण फडकत होते. परंपरेनुसार इथली संस्कृती भाषेचे दुसरे अंग बनली. भाषाप्रेम आणि जाज्वल्य अभिमानामुळे घराघरांत वसलेले छत्रपती शिवाजी महाराज तरुणांच्या हृदयावर गारूड घालू लागले. वारसाहक्काने साहित्यातली संस्कृती पुढच्या पिढीला जाऊन मिळत होती. आज मागे वळून पाहताना मराठी संस्कृतीची पायवाट प्रशस्त भासते. माझ्याचं पाऊलखुणांवर माझी छोटी पिल्लावळ, माझी नातवंड शोभून दिसतात. हा वारसा पुढे नेण्याचे बळ मिळू दे. कारण भाषा वाचली, ती बोलण्यात आली, तरचं तिची समृद्धी अभिजात राहील. ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंताच्या. प्राकृत भाषेतील गीता मराठीत आणण्याचा चमत्कार संत ज्ञानदेव करू शकतात.! तर मराठी भाषा प्रसारासाठी आपलंही योगदान तितकचं महत्त्वाचे आहे. आई आजीच्या गोष्टी माझ्यासाठी चिकार महत्त्वाच्या वाटतात. त्यांनी रूजवलेल्या संस्कारांमुळे आमच्या पिढीवर अनंत उपकाराचे ऋण आहे.

Recent Posts

जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगांचा भारत दौरा

नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…

15 minutes ago

भारताने पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हचा बुरखा फाडला

नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…

31 minutes ago

पाकिस्तानचा खासदार घाबरला; संसदेत ढसाढसा रडला!

एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…

54 minutes ago

भारताच्या हल्ल्यात मारला गेला जैश – ए – मोहम्मदचा कमांडर रउफ असगर, भारतीय विमान अपहरणाचा होता सूत्रधार

इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…

2 hours ago

रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त; भारताच्या ड्रोन हल्ल्याने पाकिस्तान हादरला!

पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…

3 hours ago

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…

3 hours ago