Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीपहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या 'ऑपेरेशन ऑल आऊट'ला सुरुवात, आतापर्यंत १० दहशतवाद्यांची घरं स्फोटकांनी...

पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या ‘ऑपेरेशन ऑल आऊट’ला सुरुवात, आतापर्यंत १० दहशतवाद्यांची घरं स्फोटकांनी उडवली

जम्मू आणि काश्मीर: पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. २५ पर्यटक आणि एका काश्मिरी तरुणाचा मृत्यूनंतर, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोदी सरकारकडून ऑपेरेशन ऑल आऊटला सुरुवात झाली आहे. याद्वारे भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांची घरे उध्वस्त केली आहेत.

गेल्या सहा दिवसांत सुरक्षा दलांनी १० स्थानिक दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली असून आणि पुढेही हे ऑपेरेशन सुरूच राहण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत ज्या दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत त्यात लष्कर-ए-तैयबाचा आदिल हुसेन ठोकर, झाकीर अहमद गनई, अमीर अहमद दार आणि आसिफ शेख, शाहिद अहमद कुट्टे, अहसान उल हक अमीर, जैश-ए-मोहम्मदचा अमीर नझीर वाणी, जमील अहमद शेर गोजरी, द रेझिस्टन्स फ्रंटचा अदनान सफी दार आणि फारूक अहमद तेडवा यांचा समावेश आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, अहसान उल हकने २०१८ मध्ये “पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले” आणि अलीकडेच तो खोऱ्यात “घुसखोर” झाला; तर लष्करचा कमांडर शाहिद अहमद कुट्टे अनेक देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहे, तसेच झाकीर अहमद गनी हा देखील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली पाळत ठेवत होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, फारुख अहमद टेडवा हा पाकिस्तानातून काम करत आहे. तर गेल्या मंगळवारी पहलगामध्ये झालेल्या हल्ल्यात आदिल हुसेन ठोकर थेट सहभाग असल्याचा संशय आहे. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांचा संपूर्णपणे खात्मा करण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे पोलिस प्रवक्त्यानी सांगितले आहे.

हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक राजनैतिक पावले उचलली आहेत. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. तसेच भारताने पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसा सेवा रद्द केल्या आहेत. सरकारच्या या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानने ही मुक्ताफळे उधळण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याची धमकी दिली आहे. ज्यामध्ये सिमला करार चा देखील समावेश आहे. १९७१ च्या युद्धानंतर स्वाक्षरी झालेल्या सिमला करारात युद्धबंदी रेषेला नियंत्रण रेषा म्हणून ओळखले जाण्याची तरतूद आहे आणि जर पाकिस्तानने ती स्थगित केली तर ते नियंत्रण रेषेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -