मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा १२५ वर्ष जुना ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल (Elphinstone Bridge) २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात (Elphinstone Bridge Closed) येणार आहे. वाहतूक कोंडी (Mumbai Traffic) रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली असल्याची माहीती दिली आहे.
एमएमआरडीएने (MMRDA) या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता. नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही काळ मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू शकते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे. त्याची शुक्रवार, २५ एप्रिल रोजी रात्री ९ पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले.
प्रभादेवी आणि परळला पूर्व-पश्चिम जोडणारा प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील एल्फिन्स्टन पूल आज शुक्रवार (दि.२५) रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. १२५ वर्षे जुन्या या पुलाचे पाडकाम करून त्या जागी एमएमआरडीए नवा डबलडेकर पूल उभारणार आहे. हे काम पुढील दोन वर्षे चालणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षे या भागात मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा मात्र विरोध आहे. आधी १० एप्रिलला पूल बंद होणार अशी माहिती समोर आली होती. पण पूल पाडण्याआधी हरकती आणि सूचना प्रशासनाने मागवल्या होत्या. त्यासाठी १३ एप्रिलपर्यंतची वेळ देण्यात आली होती. आता प्रशासनाकडून पुलाच्या पाडकामावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. शुकवारपासून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्यात याच्या पाडकामाला सुरुवात केली जाईल.
एल्फिन्स्टन ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक विभागाकडून काही बदल करण्यात आले आहेत. करी रोड पुलावरील वाहतुकीसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. करी रोड पुलावरून सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्रभादेवी आणि लोअरपरळच्या दिशेने अशी एकेरी वाहतूक सुरू राहील, तर दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत टाटा आणि केईएम रुग्णालयाच्या दिशेनं एकेरी वाहतुकीसाठी खुला राहिल.
त्यानंतर रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूल दोन्ही दिशेच्या वाहतुकीसाठी खुला असणार आहे. करी रोड पुलावरील या बदलासोबतच पर्यायी मार्ग म्हणून दादरचा टिळक ब्रिज आणि चिंचपोकळी ब्रिजचा पर्याय उपलब्ध आहे. असं असलं तरी एल्फिन्स्टन ब्रिजवरील दररोजची रहदारी पाहता येथील वाहतुकीचा भार इतर पुलांवर येणार असल्यानं मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू शकते.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…