Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीEknath Shinde: पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या आदिलच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेकडून आर्थिक...

Eknath Shinde: पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या आदिलच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेकडून आर्थिक मदत, घर देखील बांधून देणार

मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या बचावासाठी धावून जाणारा काश्मिरी तरुण सय्यद आदिल हुसैन शाहचा (Syed Adil Hussain Shah) देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. अवघ्या २० वर्षाच्या या तरुणाने ज्या प्रकारे दहशतवाद्यांना सामोरे जात आपला जीव गमावला, त्याची दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सय्यदच्या कुटुंबीयांना एकनाथ शिंदे यांकडून धनादेश देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर देखील दिला.

आदिलच्या धाडसाचे शिंदेंकडून कौतुक

या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी सय्यद आदिलने दाखवलेल्या धाडसाबाबतचा अनुभव उपमुख्यमंत्र्यांना सांगितला. त्याची दखल घेत शिंदे यांनी सय्यद आदिलच्या कुटुबीयांना तात्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला.

दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न

सय्यद आदिल पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करायचा. त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा त्याने प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर सय्यद याने धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका दहशतवाद्याने त्याला गोळी मारली, आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

नव्याने घर बांधून देण्याचे आश्वासन

सय्यद आदिलचे हौतात्म्य वाया जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच सय्यद आदिलच्या कुटुंबाला नव्याने घर बांधून देण्याचे आश्वासन देखील दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -