Friday, May 9, 2025
Homeमहत्वाची बातमीPahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या जवळजवळ असंख्य पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानाने आज गुरूवारी २४ एप्रिल पहाटे ३.३० वाजता मुंबई विमानतळावर Star Airlines VTGSI ने – Terminal 1 येथे सुखरूप पोहचली.

या सर्व पर्यटकांच्या चेहऱ्यावर मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना कश्मीर मधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या मोठ्या जीवघेण्या संकटातून व बिकट प्रसंगातून सुखरूप आपल्या भूमीत परत आल्याच्या व सुटकेचा निश्वास सुटल्याचा आनंद दिसत होता.

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव संजय मोरे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मुरजी पटेल, युवा सेना सरचिटणीस राहूल कनाल तसेच पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांनी मुंबई विमानतळावर आज पहाटे उपस्थित राहून या सर्व पर्यटकांचे शुभेच्छा व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

मुंबईत सुरक्षित पोहचण्यासाठी शिवसेनेच्या वतीने तसेच महायुती सरकारने प्रसंगावधान दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या सर्व पर्यटकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याप्रती कृतज्ञतेचे भाव व आभार व्यक्त केले.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव नाहक गमवावा लागला. तर २० जण यात जखमी झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -