नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस काश्मीर या अतिरेकी संघटनेने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गंभीरला ISIS Kashmir या नावाच्या ई मेल अॅड्रेसवरुन एक धमकीचा मेल आला आहे. या प्रकरणी गौतम गंभीरने दिल्लीतील राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
माजी खासदार आणि आता भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरला याआधीही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पण यावेळी पहिल्यांदाच त्याला अतिरेकी संघटनेकडून धमकी मिळाली आहे. यामुळे गौतम गंभीर गंभीर दखल घेऊन तातडीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी धमकीचा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
गौतम गंभीरसाठी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला २२ एप्रिल रोजी दोन ई मेल आले. दोन्ही ई मेलमधून गौतम गंभीरला धमकी देण्यात आली होती. हे दोन्ही मेल ISIS Kashmir या अकाउंटवरुन आले होते. यानंतर गौतम गंभीरने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी अतिरेकी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. लष्कर – ए – तोयबा या अतिरेकी संघटनेची संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दुसरीकडे गौतम गंभीरला धमकी आली. या दोन घटनांचा काही संबंध आहे की वातावरणाचा गैरफायदा घेऊन गंभीरला धमकावण्यात आले आहे ? या दोन्ही शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत.
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…