मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. सनरायजर्स हैदराबाद घरच्या मैदानावर खेळणार आहे. सलग ३ सामन्यात मुंबई इंडियन्स हा संघ विजयी झाला आहे. तर सनरायजर्स हैदराबादच्या विजयात सातत्याचा अभाव आहे. त्यांची फलंदाजी व गोलंदाजीही चांगली होत नाही.
सध्या हा संघ गुण तालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. सात सामन्यात फक्त दोनच विजय मिळवता आले आहेत. अभिषेक शर्मा, ट्रेव्हीस हेड, कर्णधार पॅट कमिन्स, इशान किशन, मोहम्मद शामी, हर्शल पटेल अॅडम मार्कम, भ्ुवनेश्वर कुमार असे चांगले खेळाडू असूनही त्यांना विशेष प्रभाव पाडता आला नाही. मुंबई इंडियन्स हा संघ सध्या चांगलाच फॉर्मात आहे. त्यांची गोलंदाजी व फलंदाजी चांगली होत आहे.
रोहित शर्माला सूर गवसलेला आहे त्याने चेन्नई विरुद्ध ४५ चेंडूत ७६ धावांची नाबाद खेळी केली तसेच सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी केली चेन्नईवर सहज विजय मिळविला. रायन रिकल्टन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, विल जॅक्स नमन धीर असे सरस फलंदाज मुंबई इंडियन्सकडे आहेत. तसेच गोलंदाजीतही टेंट बोल्ट, जसप्रित बुमराह, दिपक चहर, मिचेल सँटनर,अश्वनी कुमार असे गोलंदाज आहेत. सनरायजर्स हैदराबाद घरच्या मैदानावर चमत्कार करुन मुंबई इंडियन्सचा विजयी रथ रोखतोका ते पाहूया.